Inflation Saam Tv
देश विदेश

सर्वसामान्यांची होरपळ! महागाईने गाठला कळस; ८ वर्षांतील उच्चांकी

एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई वाढली आहे, जी एक मोठ्या धोक्याची चिन्हे मानली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली - एप्रिल महिन्यात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, घरगुती गॅस, सीएनजी, पीएनजीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे महागाई भडकण्याची भीती व्यक्ती केली जात होती. यावर्षी एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई वाढली आहे, जी एक मोठ्या धोक्याची चिन्हे मानली जात आहे.

देशाला कोरोना महामारीमुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महागाई कमी होईल या आशेवर असलेल्या सर्वसामान्य जनतेला आता महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच आता सर्वात चिंतेची बाब समोर आली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई वाढली आहे. अन्नधान्य महागाई गेल्या मार्चमध्ये 7.68 टक्क्यांवर होती जी आता 8.38 टक्क्यांवर पोहोचली आहे.

हे देखील पाहा -

गेल्या आठ वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली आहे. यावर्षी एप्रिलमध्ये अन्नधान्य महागाई वाढली आहे. अन्नधान्य महागाई गेल्या मार्चमध्ये 7.68 टक्क्यांवर होती जी आता 8.38 टक्क्यांवर पोहोचली आहे. तसेच मार्चमध्ये भाज्यांची महागाई 11.64 टक्के असताना एप्रिलमध्ये ती 15.41 टक्क्यांवर पोहोचली.

महागाईने आरबीआयची मर्यादा ओलांडली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने महागाईची कमाल मर्यादा 6% निश्चित केली आहे. परंतु एप्रिलच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की ते आता त्यापेक्षा खूप जास्त झाले आहे. हा सलग चौथा महिना आहे जेव्हा महागाई दर आरबीआयच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, किरकोळ महागाई दर फेब्रुवारीमध्ये 6.07% आणि जानेवारीत 6.01% होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Care Tips: हातांच्या मुद्रांमध्ये दडलाय 'हार्ट'चा उपचार? योगा एक्सपर्ट सांगतात रोज करा या ३ सोप्या मुद्रा

Masti 4 vs 120 Bahadur : '120 बहादूर' फ्लॉप की हिट? तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी? वाचा कलेक्शन

Gold Rate Prediction: नव्या वर्षात सोनं आणखी महागणार! तोळ्यामागे ३५००० रुपयांची वाढ होणार; बँक ऑफ अमेरिकेचा दावा

Maharashtra Live News Update: अंबरनाथमधील शिंदे गटाचे पदाधिकाऱ्याने शिवसेनेला केला राम राम

IND vs SA: 'गंभीर' पराभव! न्यूझीलंडनंतर आफ्रिकेनेही दिला व्हाईटवॉश, आफ्रिकेचा भारतावर ४०८ धावांनी विजय

SCROLL FOR NEXT