Arvind Kejriwal Saam Digital
देश विदेश

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर सुनिता केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; दिल्लीच्या जनतेला उद्देशून म्हणाल्या...

Arvind Kejriwal Arrest ED/Delhi Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी आणि भाजवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या जनतेने तीन वेळा निवडणून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना सत्तेच्या अहंकारातून अटक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Sandeep Gawade

Arvind Kejriwal

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुनिता केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी आणि भाजवर निशाणा साधला आहे. दिल्लीच्या जनतेने तीन वेळा निवडणून दिलेल्या मुख्यमंत्र्यांना सत्तेच्या अहंकारातून अटक केली आहे. दिल्लीच्या जनतेसोबत हा धोक्का आहे. तुमचे मुख्यमंत्री कायम तुमच्या सोबत होते. मुख्यमंत्री तुरुंगात राहू देत नाहीतर बाहेर, त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पीत केल्यांच म्हटलं आहे.

कथित मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीने अटक केली आहे. अटकेनंतर आज (२२, मार्च) अरविंद केजरीवाल यांना राऊज इव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. याप्रकरणाची सुनावणी कोर्टात पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांचा आजचा मुक्काम कोठडीतच असण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली असून अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत निवडणूक आयोगात तक्रार देण्याची शक्यता आहे.

काँग्रेसकडून के सी वेणुगोपाल, संदीप पाठक, तसेच समाजवादी पार्टीचे जावेद अली खान, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगात धाव घेतली आहे.

आपच्या नेत्यांनीही अरविंद केजरीवालच मुख्यमंत्री असणार आणि तेच सरकार चालवणार असल्याचं म्हटलं आहे. आप सरकारमधील मंत्री आतिशी यांनी, तुरुंगातून सरकार चालवता येत नाही असा कोणताही कायदा नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल हेच दिल्ली यापुढेही मुख्यमंत्री असतील, असं म्हटलं आहे.

दिल्लीचे विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनीही, केजरीवाल यांनीच तुरुंगातून सरकार चालवावं, असं संपूर्ण पक्षाचं मत आहे. तरीही गरज पडली तर आतिशी आणि आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज ही दोन नावं आहेत, जी गरज पडल्यास हे पद सांभाळू शकतात असं म्हटल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT