Delhi Liquor Scam TOI
देश विदेश

Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, आप पक्षाला मिळाले ४५ कोटी; ईडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

Delhi Liquor Scam: कथित दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झालीय. न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्राची दखल घेतली असून अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक आरोपींना समन्स बजावले आहे.

Bharat Jadhav

कथित दारू घोटाळ्यात आम आदमी पक्षाच्या अडचणीत वाढ झालीय. न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल न्यायालयाने घेतलीय. अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक आरोपींना १२ जुलै रोजी न्यायालयाने समन्स बजावले आहे. ईडीने चार्जशीटमध्ये आम आदमी पार्टीवर अनेक मोठे आरोप केले असून त्यांना आरोपी क्रमांक ३८ बनवले आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, दारू घोटाळ्यातून आम आदमी पक्षाला १०० कोटी रुपयांच्या लाच मिळाली. यापैकी ४५ कोटी रुपये थेट आम आदमी पक्षाला मिळाले होते. ही रक्कम गोवा विधानसभेत हवाला चॅनेलद्वारे वापरण्यासाठी पाठवले होते. मनी लाँड्रिंग गुन्ह्यात आम आदमी पार्टी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सहभाग पूर्णपणे स्पष्ट दिसल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केलाय.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने ४५ ​​कोटी रुपयांची रक्कम प्राप्त करणे आणि वापरणे तसेच लपवणे यासारख्या कामात पक्षाचा सहभाग असल्याचं ईडीने म्हटलंय. दरम्यान मनी लाँड्रिंग प्रकरणात राजकीय पक्षाला आरोपी बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे. वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या मद्य धोरणात मद्य व्यापाऱ्यांना फायदा झाला आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून लाच घेण्यात आली. मात्र आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकार हे आरोप फेटाळत आहे, असा दावा ईडी करत आहे.

यावर आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलीय. कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या पुरवणी आरोपपत्रात आपचे नाव समाविष्ट करण्यात आलंय. यावरून केंद्र सरकार आपविरोधात मोठे षडयंत्र रचत आहे. भाजपला 'आप'ला नष्ट करायचं असल्याचं स्पष्ट होतं असं आपचे नेते पंकज गुप्ता म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shipi Amti Recipe : कर्जतची स्पेशल झणझणीत शिपी आमटी; भाताची चव वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: स्थानिक भाषा टिकवण्यासाठी परराज्यांचे धोरण काय?,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा सवाल

हृदयद्रावक! स्कूल बसने आजी-नातीला चिरडले, कुशीतील ९ महिन्याचे बाळ चाकाखाली, मुंबईतील मन हेलावणारा VIDEO

Dowry Harassment: पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'ची आत्महत्या; हुंडाबळीचा फास कधी सुटणार?

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंगनं गाणं सोडलं नाही, रिटायरमेंटनंतरही आपल्या मधुर आवाजाने चाहत्यांना लावणार याड

SCROLL FOR NEXT