Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: 'उद्या मी सर्व नेत्यांसोबत भाजप मुख्यालयात येतोय, ज्यांना अटक करायची आहे, करा', केजरीवाल यांचं थेट PM मोदींना आव्हान

Delhi News: उद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार, खासदारांसह दुपारी 12 वाजता भाजप मुख्यालयात येत आहे. तुम्ही (PM मोदी) ज्याला पाहिजे त्याला तुरुंगात टाकू शकता: केजरीवाल

Satish Kengar

Arvind Kejriwal On PM Modi:

राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर कथित हल्ल्याचा आरोप असलेल्या बिभव कुमारला दिल्ली पोलिसांनी शनिवारी अटक केली. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि म्हणाले की, ते (PM मोदी) एकामागून एक आम आदमी पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहेत. मी पंतप्रधानांना सांगू इच्छितो की, तुम्ही हा 'जेल का खेल' खेळत आहात. उद्या मी माझ्या सर्व प्रमुख नेते, आमदार, खासदारांसह दुपारी 12 वाजता भाजप मुख्यालयात येत आहे. तुम्ही ज्याला पाहिजे त्याला तुरुंगात टाकू शकता.''

अरविंद केजरीवाल म्हणाले की, ''एकामागून एक आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. आधी मला तुरुंगात टाकले, मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकले. सत्येंद्र जैन यांना तुरुंगात टाकण्यात आले. संजय सिंह यांना तुरुंगात टाकण्यात आले. आज माझ्या पीएला तुरुंगात टाकण्यात आलं. राघव चड्ढा लंडनहून परतले आहेत, आता ते त्यांनाही तुरुंगात टाकणार असल्याचे सांगत आहेत. सौरभ भारद्वाज आतिशीला काही दिवसांत तुरुंगात टाकणार आहेत.''

पंतप्रधान मोदींवर थेट निशाणा साधत केजरीवाल म्हणाले, ''मला पंतप्रधानांना सांगायचे आहे की, पंतप्रधान 'जेल का खेल' खेळत आहेत. कधी कुणाला तुरुंगात टाकतात तर कधी कुणाला. उद्या 12 वाजता आमच्या सर्व मोठ्या नेत्यांसोबत, मी भाजप मुख्यालयात येत आहे. तुम्हाला ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे, त्यांना तुरुंगात टाका.

ते म्हणाले, ''आम आदमी पक्ष हा एक विचार आहे, तुम्ही तो संपवू शकत नाही. जर तुम्ही आम आदमी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकले तर संपूर्ण देशात 100 पट अधिक नेते जन्माला येतील. मी उद्या 12 वाजता येतोय, तुम्हाला ज्याला तुरुंगात टाकायचे असेल त्याला टाका.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानी सुरक्षा वाढवली

Banana And Health : केळीच्या पानांचे, सालीचे हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का?

Nanded : महालक्ष्मी सणासाठी आजोबांकडे आली; छतावर गेली असताना घडली दुर्दैवी घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

Manoj Jarange Patil: कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा

GST Reforms: विम्यावरील जीएसटी रद्द, प्रिमियम होणार स्वस्त, तुमचे पैसे किती वाचणार?

SCROLL FOR NEXT