Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना धक्का! जामिनावरील जनहित याचिका फेटाळली; ७५ हजारांचा ठोठावला दंड

Arvind Kejriwal Latest News: कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली.

Gangappa Pujari

दिल्ली|ता. २२ एप्रिल २०२४

कथित मद्य घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणीत हायकोर्टाने ही मागणी फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना ७५ हजारांचा दंडही ठोठावला.

याबाबाबत सविस्तर माहिती अशी की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना असाधारण अंतरिम जामीन देण्याबाबतची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना असाधारण जामीन देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आणि याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

या सुनावणीदरम्यान, तुम्हाला व्हेटो पॉवर कसा मिळतो? तुम्ही संयुक्त राष्ट्राचे सदस्य आहात का? असा सवाल न्यायालयाने याचिका कर्त्यांना विचारला. तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या आधारेच अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) न्यायालयीन कोठडीत असल्याचेही यावेळी कोर्टाने म्हटले आहे.

यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने बाजू मांडताना, मी येथे अरविंद केजरीवालांसाठी नाही तर दिल्लीच्या करोडो जनतेसाठी आलो आहे. मी येथे फक्त नागरिकांच्या हितासाठी आलो आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांच्या अटकेमुळे संपूर्ण सरकार ठप्प झाले आहे. औषधे देण्यासाठी सही करायलाही मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत. केजरीवाल यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, असा युक्तीवाद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ikkis OTT Release : धर्मेंद्र यांचा 'इक्कीस' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार?

Maharashtra Live News Update: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आज पिंपरी चिंचवडमध्ये; पत्रकार परिषद घेणार

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं! १० तोळ्यामागे ११,४०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Maharashtra Politics: पिंपरीत एबी फॉर्मवरून गोंधळ, २ पक्षांचा एक उमेदवार, निवडणूक अधिकारी बुचकळ्यात

Mumbai : न्यू इयरच्या पार्टीसाठी घरी बोलावलं, लग्नाला नकार दिल्याने वाद; गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचा प्रायव्हेट पार्ट कापला

SCROLL FOR NEXT