Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

CBI Arrest Kejriwal: तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

Bharat Jadhav

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने तिहार तुरुंगातून अटक केलीय. सीबीआयने सोमवारी तिहार तुरुंगात जाऊन अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलीय. अरविंद केजरीवाल यांना उद्या संबंधित ट्रायल कोर्टात हजर करण्याची परवानगीही सीबीआयला मिळाली असून उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भाजपचे केंद्र सरकार अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह केला. अरविंद केजरीवाल यांना खोट्या प्रकरणात अटक करण्याचा कट सीबीआयकडून रचला जात असल्याचं सिंह म्हणाले. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा धक्का देत कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सुनावणीदरम्यान हायकोर्टाने राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दिलेला जामीन अवाजवी असल्याचे म्हटलं. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर असहमती व्यक्त करत 'आप' आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत.

हायकोर्टाकडून कनिष्ठ न्यायालयाचा जामिनाचा निर्णय रद्द

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने मोठा धक्का दिला होता.  दिल्ली उच्च न्यायालयात आज केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन देण्यास नकार दिला होता. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने २० जून रोजी केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण त्या निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने ईडीच्या याचिकेवर २१ जूनला पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी आता गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT