Arunachal Pradesh Truck Accident Saam Tv
देश विदेश

Accident: ट्रक १००० फूट खोल दरीत कोसळला, २२ मजुरांचा मृत्यू; अपघाताचे थरकाप उडवणारे PHOTOS समोर

Arunachal Pradesh Truck Accident: अरुणाचल प्रदेशमध्ये मजुरांनी खचाखच भरलेला ट्रक दरीत कोसळला. ही घटना अंजाव जिल्ह्यात घडली. या अपघातामध्ये २२ मजुरांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

Priya More

Summary:

  • अरुणाचल प्रदेशमध्ये भयंकर अपघात झाला

  • मजुरांना घेऊन जाणारा ट्रक १००० फूट खोल दरीत कोसळला

  • या अपघातामध्ये २२ मजुरांचा मृत्यू झाला

अरुणाचल प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. अंजाव जिल्ह्यात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये फक्त एकच मजुराचे प्राण वाचले आहेत. गंभीर जखमी झालेल्या मजुराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळावर धाव घेतली असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशच्या छगलागम परिसरात हा अपघात झाला. मजुरांना घेऊन जाणारा ट्रक डोंगराळ भागातील नागमोडी वळणावरून जाताना दरीत कोसळला. हा ट्रक १००० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकमध्ये एकूण २३ कामगार होते. जे अरुणाचल प्रदेशमध्ये कामासाठी आले होते. या सर्व कामगारांचा अपघातामध्ये मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या कामगारांपैकी १९ जण आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गेलापुखुरी टी इस्टेट राहत होते. हे सर्व जण कॉन्ट्रॅक्टवर काम करण्यासाठी अरुणाचल प्रदेशमधील एका प्रोजेक्ट साइटवर जात होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. नागमोडी वळणावरून ट्रक दरीत कोसळून अपघात झाला.

या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या २२ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला. आतापर्यंत १३ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. उर्वरित मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिस आणि रेस्क्यू टीमकडून बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यात आहे आहे.पोलिस आणि स्थानिक नागरिक बचाव आणि मदत कार्य करत आहेत पण जंगलाचा भाग असल्यामुळे आणि रस्ता खराब असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या घटनेमुळे आसाममधील अनेक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khandeshi Papad Kushmur Khuda Recipe: खानदेशी कुसमुर पापड खुडा

Maharashtra Live News Update: थंडीचा कडाका वाढला, मुंबई पुण्यासह महाराष्ट्र गाराठला

Election : महापालिका निवडणुकीआधी शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का, १६ बड्या नेत्यांनी केला जय महाराष्ट्र

lucky zodiac signs: आज कन्या राशीत चंद्राचा प्रवेश; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी दिवस लकी

उत्खनन गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई; 4 तहसीलदारांसह दहा जण निलंबित, प्रशासनात खळबळ

SCROLL FOR NEXT