

Summary -
पुण्यात सिंहगड रोडवर भीषण अपघात
स्कूल बसने ज्येष्ठ नागरिकाला दिली जोरदार धडक
अपघातात वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला
अपघातानंतर बस चालक पळून गेला
पुण्यामध्ये भयंकर अपघात झाला. भरधाव स्कूल बसने पादचाऱ्याला चिरडलं. या अपघातामध्ये ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुण्यातील सिंहगड रोडवर घडली. या अपघातानंतर घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वृद्धाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अपघातानंतर बस चालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आज दुपारी १२:२० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. स्कूल बसने ज्येष्ठ नागरिकाला धडक दिला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू झाला. स्कूल बसने या व्यक्तीला धडक दिल्यावर चालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी सांगितले की, सिंहगड रोडवर वडगाव ब्रिजच्या दिशेने जाणाऱ्या इंद्रायणी स्कूलच्या बसने फन टाइम थिएटर समोरील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्याला समोरील शरद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. आरोपी चालक आणि संबंधित बसचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, नवी मुंबईतल्या उरणजवळ कंटेनरने दिलेल्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. तरुण दुचाकीवरून जात होता. त्याचवेळी भेंडखळ रस्त्यावर कंटेनरने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमोल ठाकूर (३५ वर्षे) असं मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव होते आणि तो भेंडखळ गावात राहणारा होता. अमोल कामावर जात असताना ही अपघाताची घटना घडली. या अपघातानंतर स्थानिकांनी रास्तारोको करत संताप व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.