भारताचं चांद्रयान-3 मिशन आता अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान 3 चंद्रावर लँड होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 उद्या म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.45 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.
इस्रोच्या या चांद्रयान मोहिमेकडे जगाचं लक्ष लागल आहे. विक्रम लँडर सध्या लँडिंग लोकेशनचे फोटो घेत आहे, ज्याचा इस्रो अभ्यास करत आहे. दरम्यान, तामिळनाडूतील एक कलाकार चर्चेत आला आहे. आपल्या कौशल्याने या कलाकाराने 4 ग्रॅम सोन्याने चांद्रयान-3 चे मॉडेल तयार केले आहे.
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील एका कलाकाराने 4 ग्रॅम सोन्याचा वापर करून चांद्रयान 3 चे मॉडेल तयार केले आहे. त्याची लांबी 1.5 इंच आहे. अवघ्या 48 तासांत त्याची निर्मिती केली आहे.
कलाकार मरियप्पन यांनी सांगितलं की, जेव्हा काही महत्त्वाची घटना घडते, तेव्हा मी सोन्याचा वापर करून त्याचे छोटे मॉडेल बनवतो. प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. या सोन्याच्या चांद्रयानाच्या मॉडेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)
23 ऑगस्ट रोजी चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगमध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्था आपली योजना बदलू शकते. इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम देसाई यांनी सांगितले की, नियोजित तारीख आणि वेळेत सॉफ्ट लँडिंगदरम्यान अडचण आल्यास ते 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले जाऊ शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.