Tim Cook Meets Pm Narendra Modi Saam Tv
देश विदेश

Tim Cook Meets Pm Narendra Modi : अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, भारतात करणार गुंतवणूक, ट्वीट करत दिली माहिती

Tim Cook : अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Satish Kengar

Tim Cook Meets Pm Narendra Modi: अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांनी ट्वीट करत या भेटीचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच टीम कूक यांनी भारतात त्यांच्या स्वागताबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

ते म्हणाले की, ''अॅपल भारतभर विस्तारासाठी गुंतवणूक करण्यास कटिबद्ध आहे. त्यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'इतक्या छान स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. शिक्षण आणि विकासकांपासून उत्पादन आणि पर्यावरणापर्यंत, आम्ही देशभर विस्तार आणि गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहोत.'' (Latest Marathi News)

टीम कुक यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ''तुम्हाला भेटून आनंद झाला. विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण आणि भारतात होत असलेल्या तंत्रज्ञानाशी संबंधित बदलांची माहिती शेअर करणे खूप आनंदाची बाब आहे.''

मुंबईत पहिले अॅपल स्टोअर सुरू

टीम कुक सोमवारी भारत दौऱ्यावर आले होते. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते मुंबईत पोहोचले. येथे त्याने अॅपलचे पहिले फ्लॅगशिप स्टोअर सुरू केले. यादरम्यान ते अनेकांना भेटले. यानंतर बुधवारी ते दिल्ली येथे पोहोचले. दरम्यान, गुरुवारी टीम अॅपलच्या दुसऱ्या स्टोअरचे उद्घाटन करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT