अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याला अशरफ घनी देश सोडण्यापुर्वी काय म्हणाले? Saam Tv
देश विदेश

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याला अशरफ घनी देश सोडण्यापुर्वी काय म्हणाले?

अफगाणिस्तानचे (Afganistan) माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांनी तालिबानच्या (Taliban) ताब्यात आल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी देश सोडला होता.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तानचे (Afganistan) माजी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) यांनी तालिबानच्या (Taliban) ताब्यात आल्यानंतर 15 ऑगस्ट रोजी देश सोडला होता. या कृत्यामुळे घनी यांच्यावर सर्व स्तारातून टीका होत आहे. मात्र, काबूल (Kabul) सोडण्यापूर्वी काही तास आधी अशरफ घनी यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांना 'मरेपर्यंत लढा' असे सांगितले होते. ब्लिन्केन (Antony Blinken) अफगाणिस्तानच्या वृत्तवाहिनीशा बोलताना म्हणाले ते अफगाणिस्तान सरकारच्या पतनानंतर काही तास आधी अशरफ घनींशी बोलले होते.

पत्रकाराने अँटनी ब्लिंकेन यांना विचारले, "तुम्ही राष्ट्रपती घनी यांना देश सोडून पळून जाण्यास मदत केली का?" प्रत्युत्तरादाखल, ब्लिन्केन यांनी घनींशी केलेल्या शेवटच्या संभाषणाबद्दल सांगितले. माजी राष्ट्रपती अशरफ घनी काबूल ताब्यात घेतल्यानंतर यूएईला पळून गेले होते. घनीं पळूनजाण्यापूर्वीही अफगाण सैन्याने तालिबानला प्रतिकार केला नव्हता.

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ते 15 ऑगस्टच्या आदल्या रात्री अशरफ घनी यांच्याशी बोलले होते. "घनींनी पळून जाण्याच्या आदल्या रात्री मला सांगितले की ते मरेपर्यंत लढायला तयार आहेत. आम्ही त्यांना मदत करण्यासाठी काहीही केले नाही." असे ब्लिन्केन म्हणाले होते. अँटोनी ब्लिन्केन यांनीही घनी रोख रक्कम घेऊन पळून गेल्याची माहिती नाकारली. ब्लिन्केन म्हणाले, "मला माहीत आहे होते की त्यांनी देश सोडला आणि त्याच्या थोड्याच वेळात सुरक्षा दले आणि सरकार दोन्ही पडले."

अमेरिका तालिबान सरकारला मान्यता देईल का?

माध्यमांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याला तालिबान सरकारला मान्यता देण्याबाबत किंवा भविष्यात त्याच्यासोबत काम करण्याबाबत विचारले. अँटनी ब्लिन्केन यांनी सूचित केले की अमेरिका भविष्यात असे करू शकते, परंतु तालिबानने काही "अटी" पूर्ण केल्या पाहिजेत. "जर अफगाणिस्तानचे भावी सरकार लोकांच्या मूलभूत हक्कांचे, मानवी आकांक्षांचे रक्षण करते, तर आम्ही अशा सरकारसोबत काम करू शकतो. जर तसे झाले नाही तर आम्ही काम करणार नाही," असे ब्लिन्केन म्हणाले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

Maharashtra News Live Update: टिपू सुलतान यांचा फोटो लाऊन महाराष्ट्राचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतात-आमदार संग्राम जगताप

पोलिस विभागात बदली एक्सप्रेस! 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात खळबळ

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

SCROLL FOR NEXT