Amul Milk  Saam Tv
देश विदेश

महागाईला आणखी एक झटका! दुधाचे भाव वाढणार; अमूलच्या एमडींनी सांगितले हे कारण

दूध दरवाढीमुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसू शकतो.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: दूध दरवाढीमुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसू शकतो. खरेतर, अमूल दुधाच्या (milk) दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. ऊर्जा, लॉजिस्टिक आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल दुधाच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात, असे अमूल (Amul) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, यावेळी दर किती वाढणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. याआधी २ मार्च २०२२ रोजी अमूलने दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

दुधाचे दर पुन्हा वाढणार

अमूलचे एमडी आरएस सोधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे की, येथून किंमती (Rate) कमी होऊ शकत नाहीत, परंतु वाढतील. सोढी म्हणाले की, सहकारी संघाने गेल्या २ वर्षांत अमूल दुधाच्या दरात ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. या गेल्या महिन्यात दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. सोढी यांच्या बोलण्यातून येत्या काळात अमूल दुधाचे दर वाढू शकतात हे स्पष्ट झाले आहे.

हे देखील पहा-

शेतकऱ्यांना फायदा

सोढी पुढे म्हणाले की, त्यांच्या उद्योगातील महागाई (Inflation) हे चिंतेचे कारण नाही. कारण त्याचा फायदा शेतकऱ्यांना (farmers) उत्पादनाच्या वाढीव किंमतीमुळे होत आहे. सोधी म्हणाले, “अमूल आणि दुग्धव्यवसाय (Dairy business) क्षेत्राने केलेली वाढ इतरांच्या तुलनेत किंवा उत्पादन खर्चातील वाढीच्या तुलनेत खूपच मर्यादित आहे. दुसरीकडे, ऊर्जेच्या किमती एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढल्या आहेत. ज्यामुळे कोल्ड स्टोरेजच्या खर्चावर परिणाम होतो. लॉजिस्टिक्सचा खर्च देखील त्याच प्रकारे वाढला आहे आणि पॅकेजिंगच्या बाबतीमध्ये देखील खर्च वाढला आहे. या दबावांमुळे मार्च महिन्यात दुधाच्या दरात १ ते २ रुपयांची वाढ झाली आहे.

नफा वसुली हा सहकाराचा मुख्य उद्देश नाही

सोधी म्हणाले की, महामारीच्या काळात दुधापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रतिलिटर ४ रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर अनेक अडचणींमुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे. परंतु, नफावसुली हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नसल्यामुळे अमूल अशा दबावांना घाबरत नाही. अमूलला मिळणाऱ्या १ रुपयापैकी ८५ पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. म्हणजेच अमूलच्या नफ्यात शेतकऱ्यांकडे सर्वाधिक लक्ष देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सडेतोड उत्तर

West Bengal: भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला, भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप; १०० जण जखमी

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

Face Care: मॉइश्चराज आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क, ५ दिवसात दिसेल फरक

शक्तीपीठ महामार्गावरून शिंदेंच्या शिवसेनेत मतभेद, २ आमदारांमध्येच जुंपली

SCROLL FOR NEXT