Elon Musk  Saam TV
देश विदेश

Twitter Blue Tick : इलॉन मस्क यांचा आणखी एक मोठा निर्णय! 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द

ट्विटरवर बनावट खात्यांची संख्या वेगाने वाढू लागल्याने कंपनीने हा निर्णय मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वृत्तसंस्था

Twitter Blue Tick News : ट्विटरचे (Twitter) नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला असून तो पुन्हा चर्चेत आला आहे. अहवालानुसार, कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला लॉन्च केलेला ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला आहे. कंपनीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा सुरु झाल्यापासून बनावट खात्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती, हे पाहता कंपनीने पेड सबस्क्रिप्शन सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.

निर्णय का बदलावा लागला

रिपोर्टनुसार, ब्लू टिक सब्सक्रिप्शन सेवा सुरू होताच बनावट खात्यांचा महापूर आला होता. कंपनीने आधी यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांत बनावट खात्यांवरून काही आक्षेपार्ह ट्विट केले गेले, त्यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. एका वकारकर्त्याने Nintendo Inc नावाच्या पेड सबस्क्रिप्शनने निन्टेंडो इंक कंपनीच्या नावाने फेक अकाऊंटवर ब्लू टिक घेत सुपर मारिओचा फोटो पोस्ट केला.

त्याच वेळी, एका व्यक्तीने दिग्गज फार्मा कंपनी एली लिली अँड कंपनीच्या नावाने एका व्यक्तीने अकाऊंटवर ब्लू टिक घेतली आणि इन्सुलिन आता विनामूल्य असल्याचं ट्विट केले. एवढेच नाही तर एका व्यक्तीने टेस्ला कंपनीचे बनावट खाते तयार करून या कंपनीच्या सेफ्टी रेकॉर्डची खिल्ली उडवली. या संपूर्ण प्रकरणामुळे कंपनीने पेड सबस्क्रिप्शन सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय जगभरात चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताच सर्वप्रथम ब्लू टिकसाठी 8 डॉलर शुल्क द्यावे लागणार ही घोषणा केली. यानंतर कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. टाळेबंदी सुरू केली. त्यानंतर कंपनीने हाय-प्रोफाइल ट्विटर अकाऊंटसाठी ऑफिशिअल लेबल दिला आणी त्यानंतर ते हटवण्यात आले. आणि आता जेव्हा ट्विटरवर बनावट अकाऊंटची संख्या वाढली, तेव्हा 8 डॉलरचं ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनची सेवा रद्द करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का, बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

महिलेनं अर्ध्यारात्री असं काही मागवलं की डिलीव्हरी बॉयही हादरला; ऑर्डर घेऊन घरी पोहोचताच जे घडलं त्यानं..., पाहा VIDEO

Nashik Tourism: नाशिकमध्ये फिरायला गेलात? मग मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या ५ किल्ल्यांना नक्की भेट द्या

Famous Singer Death: इंडियन आयडल फेम गायकाचे ४३ व्या वर्षी निधन; संगीत विश्वावर शोककळा

धनंजय मुंडे भाजपात जाणार? दादांच्या दौऱ्याला दांडी, फडणवीसांसोबत हजेरी

SCROLL FOR NEXT