Political News : आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये धक्का बसला आहे. पंजाबमधील खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनीही माहिती दिली. पंजाब विधानसभा अध्यक्षांना अनमोल गगन मान यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारल्यास पंजाबमध्ये आणखी एक पोटनिवडणूक होईल असे म्हटले जात आहे.
'मी दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सभापतींना मी माझा राजीनामा पाठवला आहे, त्यांनी तो स्वीकारावा अशी माझी विनंती आहे. आम आदमी पक्षासोबत माझ्या शुभेच्छा नेहमी असतील. पंजाब सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी मला आशा आहे', असे अनमोल गगन मान यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
अनमोल गगन मान या प्रसिद्ध पंजाबी गायिका आणि अभिनेत्री आहेत. २०२० मध्ये त्या आम आदमी पक्षामध्ये सहभागी झाल्या होत्या. २०२२ च्या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी पक्षाने तिकीट दिले होते. मोहालीतील खरार विधानसभा मतदारसंघातून अनमोल गगन मान आमदार म्हणून निवडून आल्या. त्यावेळी आप पक्षाच्या त्या सर्वात तरुण आमदार ठरल्या होत्या. त्यांच्याकडे पर्यटन आणि संस्कृती विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.
अनमोल गगन मान यांचा जन्म १९९० मध्ये मानसा येथे झाला. चंडीगडमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रात काम केले. त्यानंतर अनमोल संगीत क्षेत्राकडे वळल्या. अनमोल गगन मान यांनी १६ जून २०२४ रोजी वकील शाहबाज सिंह सोही यांच्याशी लग्न केले. शाहबाज सिंह हे पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयामध्ये वकील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.