Karnataka latest crime news साम टीव्ही मराठी
देश विदेश

crime : भूलतज्ज्ञाची अपार्टमेंटमध्येच निर्घृण हत्या, ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी; डॉक्टर पत्नीच्या कृत्याने खळबळ

Karnataka latest crime news : कर्नाटकातील धारवाड येथे ४५ वर्षीय भूलतज्ज्ञ डॉ. किरण होननवर यांची अपार्टमेंटमध्ये हत्या झाली. या घटनेत त्यांचा ८ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला आहे.

Namdeo Kumbhar

Karnataka anesthesiologist murder case : कर्नाटकच्या धारवाडमध्ये एका अपार्टमेंटमध्ये ४५ वर्षीय एनेस्थिसियोलॉजिस्ट डॉ. किरण होननवर यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्यांचा ८ वर्षांचा मुलगाही चाकूचे गंभीर घाव लागलेल्या अवस्थेत सापडला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पत्नीला अटक केली असून तपास सुरू आहे.

हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही सोसायटी अत्यंत सुरक्षित असल्याने बाहेरून कोणीतरी आत येण्याची शक्यता नाही. घटनेच्या वेळी घरात फक्त पती, पत्नी आणि मुलगाच होते. नातेवाईकांनी वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी घरी जाऊन पाहिले. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी प्रियांकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेय. प्रियांका या स्वतः एक नेत्रतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

घरात फक्त नवरा, बायको आणि मुलगा होते

पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी घरात फक्त पती, पत्नी आणि मूल होते. डॉ. किरण यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. प्रियांकाने पती विश्रांती घेत असल्याचे सांगितले आणि नंतर ते बाहेर गेल्याचे सांगितले. संध्याकाळपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने, कुटुंबीय अपार्टमेंटमध्ये धाव घेतली. त्यावेळी ते रक्ताने माखलेले आढळले. त्यांना घरात जखमी मूलही आढळले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.

बाळ श्वास घेत होते

पोलिसांनी सांगितले की, ते पोहोचले तेव्हा बाळ श्वास घेत होते. बाळाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. किरण एका खोलीत मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी अद्याप घटनेचा नेमका क्रम निश्चित केलेला नाही. पोलीस आयुक्तांनी सांगितले की, पत्नी सध्या धक्क्यात असून स्पष्ट जबाब देऊ शकत नाही. त्यांनी सांगितले की, घटनेमागील हेतू निश्चित करण्यासाठी ते तिच्या जबाबांची पडताळणी करत आहेत. त्याशिवाय किरण आणि प्रियांका यांच्या कुटुंबांकडून माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांशी कोणताही वाद झाल्याचे संकेत नव्हते. अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे.

नातेवाईकांनी पत्नीवर आरोप केला

नातेवाईकांनी किरण यांच्या हत्येला पत्नी डॉ. प्रियांका या जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पण पोलिसांनी त्यांच्या सहभागावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.पोलिसांकडून प्रियांकाचा जबाब घेतला जात आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही आणि इतर पुरव्यांचा शोध घेतला जात आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे दिसते, मात्र यामागील नेमके कारण अद्याप कळलेले नाही. पोलिसांच्या मते, पोस्टमार्ट रिपोर्ट आणि पुढील तपासानंतर हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eetha Controversy: इतिहासाशी छेडछाड सहन करणार नाही; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'वर विठाबाई नारायणगावकरांच्या कुटुंबाचा आक्षेप

शरद पवारांना एनडीएच्या दिग्गज मंत्र्याची खुली ऑफर; प्रकाश आंबेडकरांनाही सत्तेत येण्याचे आवाहन, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

Akola : अकोल्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या पथकाची गुटखा कारखान्यावर धाड; ५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Maharashtra News Live Update : जेजुरी अपघातातील मृतांचा आकडा वाढला

CBSE 3 Language Policy: इयत्ता नववीत तिसरी भाषा शिकवावी की नाही? सीबीएसईच्या त्रिभाषा धोरणावर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं

SCROLL FOR NEXT