अमेरिकेच्या टेक्सासमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. अपघात मृत पावलेले सर्व भारतीय हे आंध्रप्रदेशातील काँग्रेस आमदाराचे नातेवाईक होते. या घटनेने मृतांचे कुटुंब आणि त्यांच्या मित्र-नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Latest Marathi News)
मीडिया वृत्तानुसार, आंध्रप्रदेशमधील आमदार पी वेकेंट सतीश कुमार यांचे नातेवाईक हे ख्रिसमससाठी अमेरिकेत गेले होते. पी वकेंट हे आंधप्रदेशातील मुम्मीदिवरम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये कार आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला. या कारमध्ये एकूण सात लोक होते. टेक्सासमधील हायवेवर ही कार वेगात होती. त्यावेळी या कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील एक व्यक्ती सोडून इतर ६ जण जागीच ठार झाले.
या अपघातातील जखमी व्यक्तीला तत्काल एयरलिप्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या जखमी व्यक्तीची प्रकृती नाजूक असल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात पी नागेश्वर, सीता महालक्ष्मी, नवीना, कृतिका, निशिता आणि अन्य एकाचा मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अमेरिकेत कार अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमिरेकेत मृत पावलेले लोक हे आंध्रप्रदेशचे आमदार पी वेकेंट सतीश कुमार यांचे नातेवाईक होते. पी वेकेंट सतीश कुमार हे दोनवेळा वाईएसआर काँग्रेसच्या तिकीटावर दोनदा जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत.
तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका ही संस्था सहा जणांचे मृतदेह भारतात पाठविण्यास सहकार्य करत आहे. या भीषण अपघातात ट्रकमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.