आंध्र प्रदेशमध्ये अपघाताची भीषण दुर्घटना घटना घडली. आंध्र प्रदेशमधील माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्या कारखाली चिरडून ५४ वर्षीय कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्री रेड्डी यांचा ताफा बुधवारी गुंटुर जिल्ह्यात आला होता. त्यावेळी स्वागताला आलेल्या कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशच्या येतुकुरु भागात झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
चिली सिंगैया असे अपघातात मृत पावलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. सिंगैया हे वेंगळयपालेम गावाचे रहिवासी असून वाय एसआर काँग्रेस पक्षाचा समर्थक आहेत. जगन मोहन रेड्डी हे रेंटापल्ली गावात एका पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आले होते. त्यावेळी जगन मोहन रेड्डी यांचा ताफा गावात आल्यानंतर कार्यकर्त्यांचा गराडा त्यांच्या जवळ पोहोचला. कार्यकर्ते त्यांच्यावर फुलांची उधळण करत होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यातूनच त्यांची कार पुढे पुढे जात होती. त्याचवेळी एक कार्यकर्ता माजी मुख्यमंत्र्यांच्या कारखाली चिरडला गेला. या घटनेत कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघाताचे भयानक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माजी मुख्यमंत्र्यांचा ताफा आल्यानंतर कार्यकर्त्यांसहित चिली सिंगैया देखील स्वागताला पोहोचले. माजी मुख्यमंत्र्यांच्या कारजवळ कार्यकर्त्यांनी गराडा घातला. सर्व कार्यकर्ते फुलांची उधळण करत घोषणाबाजी करत होते. त्यावेळी कारसमोर सिंगैया जमिनीवर पडले. त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांची कारने थेट सिंगैया यांना चिरडलं. कारचं चाक थेट सिंगैया यांच्या मानेवरून गेलं. अपघातानंतर सिंगैया यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. अपघातावेळी सिंगैया गंभीर जखमी झाले होते. काही वेळाने डॉक्टरांनी सिंगैया यांना मृत घोषित केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुटुंरचे पोलीस अधीक्षक सतिश कुमार आणि पोलीस महानिरीक्षक एस. एस. त्रिपाठी यांच्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारखाली येऊन कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू झाला. माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये ३० ते ३५ वाहने होती. अधिकृतपणे केवळ तीन वाहनांना परवानगी होती. अनधिकृत वाहने ताफ्यात कशी आली, याची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.