Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यात शनिवारी धक्कादायक घटना घडली. येथील १८ भटक्या कुत्र्यांवर विषप्रयोग करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या विषप्रयोगानंतर १८ कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. आरोपीने कबुली दिली असून, सरपंचांच्या आदेशानुसार हे कृत्य केले आहे, असे त्याने सांगितले.
विषप्रयोगानंतर १८ कुत्र्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्राणीमित्र संघटनांचे सदस्य आक्रमक झाले होते. आरोपींविरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्राणीमित्रांनी केली होती. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वी तेलंगणातही असाच धक्कादायक प्रकार घडला होता. तेथील १०० कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले होते.
आंध्र प्रदेश पोलिसांनी वीरबाबू याच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. चेबरोले गावचे सरपंच आणि सेक्रेटरीने घातक इंजेक्शन देऊन कुत्र्यांना मारण्याचे आदेश दिले होते, असे आरोपीने सांगितले. या घटनेनंतर अनेक संघटनांनी सरपंचांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावर्षीच्या सुरुवातीला तेलंगणात सिद्दीपेट जिल्ह्यात १०० हून अधिक भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारण्यात आले होते. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
या मुक्या प्राण्यांनी तुमचं काय वाईट केलंय?
या घटनेनंतर आता प्राणीमित्र संघटना आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या मुक्या प्राण्यांचा तुम्हाला काय त्रास होतो, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. एका वर्षापूर्वी आंध्र प्रदेशच्या वेस्ट गोदावरी जिल्ह्यात लिंगापालम गावात असाच एक आदेश दिल्याचे उघड झाले होते. सरपंच आणि सेक्रेटरीने जवळपास ३०० भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारले होते. त्यानंतर एका तलावाजवळ खोदलेल्या खड्ड्यात त्यांना पुरण्यात आले होते.
अनेक नागरिकांना कुत्र्यांनी घेतला चावा, स्थानिकांचा दावा
स्थानिकांच्या दाव्यानुसार, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला होता. घरातून बाहेर पडणेही कठीण झाले होते. मुलंही खेळायला घराबाहेर पडू शकत नव्हते. अनेकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या चालकांचा पाठलाग करण्यासारख्या घटना घडत होत्या. त्यामुळे अपघातही घडत होते. त्यामुळे काही नागरिकांनी सरपंचांकडे तक्रारी केल्या होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.