Tomato  Saam tv
देश विदेश

Andhra Pradesh Tomato Farmer: टोमॅटोनं केलं सोनं! शेतकरी झाला मालामाल, ४५ दिवसांत कमावले तब्बल ४ कोटी रुपये

Priya More

Andhra Pradesh News: संपूर्ण देशात सध्या टोमॅटोचे दर (Tomato Price) प्रचंड वाढले आहेत. टोमॅटोच्या गगनाला भिडलेल्या किमतीमुळे सर्वसामान्य जनतेच्या जेवणातून टोमॅटो गायब झाला आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले अशा शेतकऱ्यांची मात्र चांदी झाली आहे. टोमॅटोचा भाव वाढल्यामुळे या शेतकऱ्यांची मालामाल झाली आहे. अशामध्ये या टोमॅटोनेच आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याचे (Andhra Pradesh Tomato Farmer) नशीब बदलले आहे. आंध्र प्रदेशच्या एका शेतकऱ्याने टोमॅटो विकून तब्बल ४ कोटी रुपये कमावले आहे.

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चंद्रमौली हा शेतकरी सध्या चर्चेत आला आहे. या शेतकऱ्याने टोमॅटो विकून अवघ्या 45 दिवसांत 4 कोटी रुपये कमावले. टोमॅटोने या शेतकऱ्याचे आयुष्य बदलले असून सध्या तो कोट्यवधीचा मालक झाला आहे. या शेतकऱ्याने टोमॅटो विकून ४ कोटी कमावले यामधील ३ कोटी रुपयांचा त्याला नफा झाला आहे.

भाव जास्त असताना शेतकरी चंद्रमौली यांनी मदनपल्ले मार्केटमध्ये तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यात टोमॅटोचा माल पाठवला होता. शेतकरी चंद्रमौली आणि त्यांच्या पत्नीने एप्रिलमध्ये करकमंडला गावात 22 एकर जमिनीवर टोमॅटोची लागवड केली होती. गेल्या 45 दिवसांत त्यांनी टोमॅटोच्या 40 हजार पेटी विकून 4 कोटी रुपयांची कमाई केली.

यावेळी चांगला वीजपुरवठा झाल्याने उत्पादन चांगले आले. पण यावेळी टोमॅटोच्या दरात झालेली प्रचंड वाढ हा सर्वात मोठा बदल ठरला असल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. या शेतकऱ्याने पुढे सांगितले की, टोमॅटोच्या उत्पादनातून एवढी कमाई होईल असे मला कधीच वाटले नव्हते. नफ्यातील काही भाग फलोत्पादन उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी गुंतवण्याचा या शेतकऱ्यांचा प्लान आहे. यापूर्वी, तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील शेतकरी बन्सुवाडा महिपाल यांनी एका महिन्यात टोमॅटो विकून दोन कोटी रुपये कमवले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT