GHM Demolished Jagan Mohan Reddy House Yandex
देश विदेश

Andhra Pradesh: सत्ता बदलताच महापालिकेची धडक कारवाई; जगनमोहन रेड्डी यांच्या घरावर फिरवला बुलडोझर

GHM Demolished Jagan Mohan Reddy House : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा त्रास कमी होताना दिसत नाही. आता हैदराबाद महापालिकेने बेकायदा बांधकाम पाडल्याची कारवाई केलीय.

Bharat Jadhav

आंध्र प्रदेशात नवीन सरकार येताच ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने धडक करावाई सुरू केलीय. महापालिकेने माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्या घरावर बुलडोझर फिरवत बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त केलंय. लोटस पॉन्डमध्ये जगनमोहन रेड्डी याच्या आवासासमोर सुरक्षेसाठी करण्यात आलेलं बांधकाम महापालिकेने पाडलंय.

अतिक्रमण आणि रस्त्याच्या बांधकामाबाबत नगर परिषदेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. जगनमोहन रेड्डी यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्याच्या कडेला खोली बांधण्यात आली होती. आंध्र प्रदेशात जगन मोहन रेड्डी यांचा पराभव झालाय. त्यांची सत्ता गेल्यानंतर त्यांची सुरक्षा सुद्धा हटवली जाणार आहे. त्यांना आता सुरक्षेची गरज नसल्याने घरासमोरील बांधकाम पोलिसांच्या उपस्थितीत पाडण्यात आले आहे.

हैदराबादमधील लोटस पॉन्डमध्ये फूटपाथ आणि रस्ता बेकायदेशीरपणे बांधण्यात आला, त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. या बांधकामामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे बांधलेले तीन शेड बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आले. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सरकारनेही अनेकवेळा बेकायदेशीर बांधकामांसंदर्भात इशारा दिला होता.

आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या YSRCP पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. राज्यातील १७५ विधानसभा जागांपैकी त्यांच्या पक्षाला केवळ ११ जागा मिळाल्या. तर तेलगू देसम पार्टी (टीडीपी) १३५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय. पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला २१ तर भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT