आंध्र प्रदेशात बस-डंपर धडकेत भीषण अपघात
अपघातानंतर बसला आग लागून १४ प्रवाशांचा मृत्यू
१२ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
आंध्र प्रदेशमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. प्रवासी बसने डंपरला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर बसला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. आंध्र प्रदेशच्या मार्कापूरमच्या निकट रायवरम येथे हा अपघात झाला. पोलिस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अनेकांचे प्राण वाचवले.
मिळालेल्या माहितीनुसार, रायवरम येथील स्लॅबच्या खाणीवर हा अपघात झाला. प्राशांनी खचाखच भरलेल्या भरधाव बसने खडी वाहून नेणाऱ्या डंपरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बसने पेट घेतला. बसमधील प्रवासी झोपेत होते. आगीचा भडका उडून संपूर्ण बसला आगीने वेढा घातला. आग लागल्याने प्रवासी बसमध्येच अडकले. या आगीत होरपळून १४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. अपघातामध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये १४ प्रवासी जिवंत जळाले. १२ जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मार्कपुरमचे डीएसपी नागराजू यांनी सांगितले की, अपघातग्रस्त बसमधून ४० प्रवासी प्रवास करत होते. काही मृतदेह अजूनही बसमध्ये अडकले असल्याची शक्यता आहे. अपघातानंतर बसला आग लागल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले आहे. मुख्यमंत्री एन चंद्रबाबू यांनी या अपघातामध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. पोलिस या अपघातामागचे कारण शोधत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.