Anant Ambani Viral Video x
देश विदेश

Anant Ambani : भक्ती यात्रेवर चाललेल्या अनंत अंबानींचं पक्षी प्रेम, ट्रकभर कोंबड्यांचा जीव वाचवला; Video व्हायरल

Anant Ambani Viral Video : अनंत अंबानी सध्या भक्की यात्रेमध्ये व्यस्त आहेत. जामनगर ते द्वारकेपर्यंत ते पायी चालत जाणार आहेत. अशातच अनंत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या चर्चेत आहे. अनंत अंबानी मागील काही दिवसांपासून भक्ती यात्रेवर आहेत. जामनगर ते द्वारकेपर्यंत चालत जाण्याचे अनंत अंबानी यांनी ठरवले आहे. ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी भक्ती यात्रेचे आयोजन केले आहे. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एका कोंबड्यांनी भरलेला ट्रक पाहायला मिळत आहे. ही कोंबड्याची गाडी अनंत अंबानी यांनी खरेदी केली आहे आणि कोंबड्यांना जीवनदान दिले आहे. ट्रकभर कोंबड्याचे पैसे त्यांनी मालकाला दिल्याचे म्हटले जात आहे. अनंत अंबानी यांनी कोंबडी हातात धरुन चालत गेल्याचेही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

कोंबड्यांची खरेदी करुन त्यांचा जीव वाचवणाऱ्या अनंत अंबानी यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी या कृतीवरुन अनंत यांचे कौतुक केले आहे. तर काहीजणांनी अनंत यांच्या मनात प्राणीपक्षी यांच्याबाबत भूतदया आहे अशा कमेंट्स केल्या आहेत. अंबानींच्या भक्ती यात्रेमधील या व्हिडीओची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

अनंत अंबानी हे मागील पाच दिवसांपासून पदयात्रा करत आहेत. १४० किमी लांब असलेली यात्रा पूर्ण करण्यासाठी ते दररोज रात्री १०-१२ किमी चालले असल्याचे म्हटले जात आहे. १० एप्रिल रोजी अनंत यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने ते जामनगरहून द्वारकेला जाणार आहे. द्वारकेला जाऊन ते १० एप्रिल रोजी पूजा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इस्टर्न फ्रीवेचा विस्तार होणार, आता दक्षिण मुंबई ते ठाण्यात ३० मिनिटांत पोहोचा; कधी होणार काम पूर्ण?

Health Tips: आजोबा म्हणणार, अभी तो मैं जवान हूँ; साठीनंतरही तुम्ही दिसणार 'तरुण'

Local Body Election: मतदानाच्या आदल्या दिवशी हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; बॅगेत 100,200,500 अन् 50 रुपयांच्या नोटांचे बंडल

Maharashtra Politics : 'भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत'; कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष पेटला

पनवेलमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ उघड; 268 मतदारांचा एकच बाप

SCROLL FOR NEXT