CCTV Footage Saam TV
देश विदेश

Railway Accident CCTV: साक्षात 'देव' धावून आला! महिला RPF कॉन्स्टेबलने वाचवले महिला प्रवासाचे प्राण, VIDEO व्हायरल

Telangana News: बेगमपेट रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महिला कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Secunderabad Railway Accident : रेल्वे अपघाताचे अनेक प्रसंग स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर येतात. मागील काही दिवसात आरपीएफ कर्मचाऱ्यांनी अनेक प्रवाशांचा प्राण वाचवल्याचे व्हिडीओ देखील समोर आले होते.

तेलंगणातून असाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका महिला कॉन्स्टेबलने घाईघाईत ट्रेनमध्ये चढणाऱ्या महिलेचा जीव वाचवला आहे. बेगमपेट रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) महिला कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला प्रवाशाचा जीव वाचवला आहे. महिला कॉन्स्टेबलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

लिंगमपल्ली-फलकनुमा ट्रेनमध्ये एक महिला प्रवासी चढण्याचा प्रयत्न करत होती. आरपीएफ कॉन्स्टेबल के. सनीताने प्रवासी चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहिलं. ट्रेनचा वेग वाढवल्यानंतर महिलेचा तोल गेला अन् ती धडपडली. त्याचवेळी सनीता यांनी धाव घेत महिलेला ट्रेनपासून दूर खेचलं. यामुळे महिलेचा जीव वाचला. असताना मंगळवारी स्टेशनवर ही घटना घडली.

दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुण कुमार जैन यांनी सनीताचे अभिनंदन केलें. सनिताने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महिला प्रवाशाचे प्राण वाचले. सनीताने दाखवलेल्या शौर्य आणि सतर्कतेच्या कृतीमुळे आमच्या रेल्वे संरक्षण दलाचे मनोबल तर वाढतेच पण इतर रेल्वे कर्मचाऱ्यांनाही असे प्रयत्न करण्यास प्रोत्साहन मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

गौरी खानला शालिनी पासीबद्दल जाणवते चिंता, काय आहे नेमक कारण?

Viral Video: वाह! काटा लगा गाण्यावर लोकलमध्ये प्रवाशांची जुगलबंदी, आजोबांनाही केला हटके डान्स; पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT