Army ALH Dhruv Helicopter crashed Saamtv
देश विदेश

Army Helicopter crashed: मोठी बातमी! जम्मू- काश्मिरमध्ये सैन्यदलाचे विमान कोसळले; २ पायलट जखमी

Army ALH Dhruv Helicopter crashed: या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय लष्कराचे तीन अधिकारी होते असे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

Army Chopper Crashed: जम्मू काश्मिरमधील (Jammu And Kashmir) किश्तवाडमधील दुर्गम भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची मोठी दुर्घटना समोर आली आहे. या अपघातात पायलटला दुखापत झाल्याचे समोर आले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय लष्कराचे तीन अधिकारी होते असे सांगण्यात येत आहे. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. (Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह भागात गुरुवारी सकाळी लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरचा (Helicopter Crash) मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले पोलिस आणि लष्करालाही या बाबतची माहिती देण्यात आली. अपघाताशी संबंधित एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये काही लोक खराब झालेल्या हेलिकॉप्टरजवळ जमल्याचे दिसत असून सध्या बचावकार्य सुरू आहे.

दरम्यान, अपघाताच्या कारणाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नसून, हवामानामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जखमी वैमानिकांसाठी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT