Mobile Explosion in Running Train Causes Panic Saam
देश विदेश

धावत्या ट्रेनमध्ये चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट; क्षणात सर्वत्र आगच आग, रात्री नेमकं काय घडलं?

Mobile Explosion in Running Train Causes Panic: जनसेवा एक्सप्रेसमध्ये मोबाईल फोन फुटला. स्फोटामुळे आग लागली अन् क्षणात पसरली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

Bhagyashree Kamble

  • धावत्या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये तरूणाचा मोबाईल फुटला.

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.

  • प्रवाशांना सुरक्षितपणे दुसऱ्या कोचमध्ये हलवण्यात आले.

अमृतसरहून पूर्णिया कोर्टच्या दिशेनं जाणाऱ्या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली. ट्रेनमध्ये मोबाईल फोन चार्जिंगमध्ये असताना मोठा स्फोट झाला. क्षणात आग पसरली. आग इतकी प्रचंड होती की, ट्रेनच्या डब्याला आग लागली. आग इतकी प्रचंड होती की, ट्रेनच्या खिडक्यांमधून ज्वाला दिसत होत्या. यामुळे ट्रेनमधील प्रवासी गंभीर जखमी झाले होते. ही धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जनसेवा एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १४६१८)मध्ये ही ट्रेन अमृतसरहून पूर्णिया कोर्टच्या दिशेनं जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६:१० वाजता सहरसा येथील सोनबरसा कचहरी स्टेशनजवळ घडली. ट्रेनमधील राम कुमार या प्रवाशाने सांगितले की, 'चार्जिंग करण्यासाठी मोबाईल लावला होता. चार्जिंग करताना अचानक मोबाईल फोन फुटला. क्षणात मोबाईलला आग लागली.'

'आग इतकी भीषण होती की काही मिनिटातच आग पसरली', अशी माहिती राम कुमार याने दिली. रेल्वे अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, ' समस्तीपूर भागात जनसेवा एक्स्प्रेस धावत होती. दरम्यान मोबाईल फुटल्याने आग लागली. आग ताबडतोब विझवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही'.

दरम्यान, कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. अग्निशमन यंत्राच्या मदतीने आग ताबडतोब विझवण्यात आली. सर्व प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये हलवण्यात आले. घटनेनंतर सिव्हिल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक टिमला माहिती देण्यात आली. आग विझवल्यानंतर ट्रेन स्टेशनवरून पुढे हलवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT