Highest Female Drinkers  Saam tv
देश विदेश

Liquor : मोठी दुर्घटना! दारूने जीव घेतला, १५ जणांचा मृत्यू

Amritsar Toxic Liquor Tragedy: अमृतसर जिल्ह्यातील मजीठा परिसरात विषारी दारूचे सेवन करून १४ जणांचा मृत्यू. चार संशयित अटकेत. बेकायदेशीर दारू विक्रीवर चौकशीचे आदेश.

Namdeo Kumbhar

Amritsar News : विषारी दारू प्यायल्यामुळे अमृतसरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विषारी दारूमुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ६ जण गंभीर आजारी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अमृतसरमधील मजीठा येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळातच पंजाब सरकार आणि राज्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही २०२० मध्ये अमृतसर, तरनतारन आणि गुरदासपूर जिल्ह्यांत अशाच प्रकारच्या विषारी दारूमुळे ४१ जणांचा मृत्यू झाला होता.

पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील मजीठा परिसरात मरारी कला, भंगाली कला, जयंतीपुर, थडीवाला आणि नंगल्ली गावांमध्ये विषारी दारूमुळे दुर्घठना घडली. रविवारी संध्याकाळी या गावांमध्ये स्थानिकांनी एकाच दुकानदाराकडूनदारू घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

रविवारी रात्री दारू प्यायल्यानंतर सोमवारी सकाळी काही जणांचा मृत्यू झाला. तर काही जणांना त्रास होऊ लागला म्हणून रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामधील काही जणांचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनी पोलिसांना न कळवता काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. रात्री उशिरा पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. मजीठा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चार संशयितांना अटक केली आहे. पोलिसांनी गावांमध्ये घरोघर जाऊन तपासणी केली आणि संशयित दारूचा साठा जप्त केला.

पोलीस अधिकारी साक्षी साहनी यांनी सांगितले की, सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटना प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चार जणांना अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

मोठी बातमी! निवडणूक प्रचारादरम्यान NDAच्या महिला उमेदवारावर हल्ला,दगडफेकीत आमदाराचं डोकं फुटलं

India A Squad : वनडे संघात रोहित शर्मा, विराट कोहलीला स्थान नाही; इंडिया ए संघाची घोषणा, तिलक वर्मा कॅप्टन

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

नेल एक्स्टेंशन करताना 'या' गोष्टींची अवश्य काळजी घ्यावी

SCROLL FOR NEXT