Prayagraj cold storage collapse X
देश विदेश

Cold Storage : माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये भयंकर दुर्घटना; ९ जणांचा मृत्यू

Prayagraj cold storage collapse : प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ९ मजुरांचा मृत्यू झाला. अमोनिया गॅस गळतीमुळे दुर्घटना घडल्याचा संशय असून बचावकार्य सुरू आहे.

Namdeo Kumbhar

ammonia gas leak accident : कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळल्यामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये आज ही दुर्दैवी घटना घडली. अचानक भिंत कोसळल्यामुळे कोल्ड स्टोरेजमध्ये काम करणाऱ्या ९ मजुरांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. फाफामऊ परिसरात या दुर्घटनेमुळे एकच गदारोळ उडाला आहे. चांदपूरच्या माजी आमदाराचे हे कोल्ड स्टोरेज असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शीने भिंत कोसळण्याआधी मोठा स्फोटासारखा आवाज ऐकल्याचे सांगितले. अचानक काहीतरी आवाज आला अन् भिंत कोसळली, असे तेथील एका स्थानिकाने सांगितले.

प्रयागराजमधील फाफामऊ परिसरात कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळल्याची माहिती मिळताच बचाव पथकाने घटनास्थळावर धाव घेतली. तात्काळ ढिगारा काढण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ९ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांकडून या घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. ९ मजुरांचे मृतदेह सध्या पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. कोल्ड स्टोरेजमधील दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे.

दुर्घटना नेमकी कशी घडली? महत्त्वाचे कारण आले समोर

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अमोनिया गॅसचा पाईप फुटल्यामुळे ही दुर्घटना घडलेली असू शकते. अमोनिया गॅसचा पाईप फुटल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये वायू गळती सुरू झाली. कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले अन् ते सैरावैरा धावू लागले. ही दुर्घटना झाली त्यावेळी कोल्ड स्टोरेजमध्ये २० मजूर काम करत होते. अचानक भिंत कोसळल्यामुळे अनेक मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. दरम्यान, जेवणाची वेळ होती. जेवणानंतर सर्वजण आराम करत असतानाच इमारत कोसळली. "आत असलेले कोणीही बाहेर पडू शकले नाही. आम्ही कसाबसा आमचा जीव वाचवला," असे एका कामगाराने सांगितले.

संतप्त जमावाची दगडफेक, नेमकं झालं काय?

दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाली. पण त्यांना येण्यास उशीर झाल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. पोलिसांसोबतही जोरदार वाद झाला. दरम्यान, अडथळ्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. प्रयागराजचे पोलीस आयुक्त जोगिंदर कुमार आणि जिल्हाधिकारी मनीष वर्मा घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके घटनास्थळी उपस्थित आहेत. अमोनिया वायूच्या दुर्गंधीमुळे बचावकार्यात अडथळाही येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur: जोतिबा मंदिरात पुजारी-भाविकांमध्ये कोणत्या कारणावरून हाणामारी झाली? नेमकी चूक कोणाची?

Viral Video: प्रेझेंटेशन देताना आला बॉयफ्रेंडचा मेसेज, स्क्रिनवर टेक्स पाहून क्लासमध्ये पसरला हशा, Video

Strawberry Blossom Recipe: उन्हाळ्यात लिंबू पाणीपेक्षा घरी बनवा टेस्टी आणि रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी ब्लॉसम

Maharashtra Live News Update: कांदा आणि मका उत्पादकांच्या विविध मागण्यांच्या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक

Qutub Minar history: कुतुब मीनार कोणी बांधला होता?

SCROLL FOR NEXT