Amit Shah Gujarat  SaamTV
देश विदेश

गुजरात दंगल मोदींनी घडवली हा आरोप खोटा; अमित शाहांनी सोडलं मौन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरात दंगलीवर मौन सोडलं

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगल प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतरांना एसआयटीने क्लीन चिट दिली होती. त्याला आव्हान देणारी काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं काल, शुक्रवारी फेटाळून लावली. तसेच एसआयटीचा अहवाल कायम ठेवला. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच गुजरात दंगलीवर मौन सोडलं. (Amit Shah Latest News)

एका बड्या नेत्याने एकही चकार शब्द न काढता आणि भगवान शंकरानं विषप्राशन केल्याप्रमाणं सर्व दुःख, वेदना झेलून १८ ते १९ वर्षांचा लढा लढला. मी त्यांना खूप जवळून दुःख सहन करताना पाहिलं आहे, असं अमित शहा (Amit Shah) म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीवर पहिल्यांदाच मौन सोडलं. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत २००२ साली गुजरातमध्ये नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं.

संपूर्ण मुलाखत पाहा!

गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'एका बड्या नेत्यानं (Narendra Modi) काहीही न बोलता आणि भगवान शंकरानं विषप्राशन केल्याप्रमाणं सर्व वेदना झेलतानाच १८ ते १९ वर्षांची मोठी लढाई लढली आहे. या सगळ्या वेदना सहन करताना मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. केवळ एक प्रचंड इच्छाशक्ती असलेली व्यक्तीच कोणतंही भाष्य न करण्याची भूमिका घेऊ शकत होता. कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होतं.'

राहुल गांधींना टोला

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची नुकतीच ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्याविरोधात काँग्रेसचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यावर अमित शहा यांनी टोला लगावला. मोदीजींनी एसआयटीसमोर हजर होताना कोणताही ड्रामा केला नाही. माझ्या समर्थनार्थ या, आमदार-खासदारांना बोलवा आणि धरणे धरा, असं काही झालं नाही. जर एसआयटीला मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, तर ते स्वतः सहकार्य करण्यात तयार होते, विरोध कशाला? असा टोला शहा यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता लगावला.

विशिष्ट विचारधारेने प्रेरित मीडिया, काही पत्रकार आणि एनजीओंनी खोटं पसरवलं- शहा

भाजपचे काही राजकीय विरोधक, विशिष्ट विचारधारेने आणि राजकारणाने प्रेरित पत्रकार आणि काही एनजीओंनी खोटे पसरवले. त्यांच्याकडे एक मजबूत इकोसिस्टम होती. त्यामुळे प्रत्येक जण असत्याला सत्य मानू लागले, असं अमित शहांनी सांगितलं.

जाकिया जाफरी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अमित शहा म्हणाले की, 'मी खूप घाईघाईत (२४ जून) निकाल वाचला. त्यात तिस्ता सेटलवाड यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यांची एक एनजीओ होती. त्यांच्यामार्फत सर्व पोलीस ठाण्यांत भाजप कार्यकर्त्यांशी संबंधित अशी निवेदने दिलेली होती. मीडियाकडून इतका दबाव होता की, सर्व निवेदने खरी मानली गेली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT