Amit Shah calls CM of All States social media
देश विदेश

Pahalgam Attack: भारत छोडो...पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला सर्वात मोठा दणका

Amit Shah calls CM of All States : पहलगाम हल्ल्यानंतर सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पाकिस्तानी नागरिकांना आपापल्या राज्यांतून बाहेर काढावे, असे आदेश त्यांनी दिले.

Nandkumar Joshi

Jammu Kashmir Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आपापल्या राज्यांतून पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर बाहेर काढा, असे अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. गृहमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचा संबंध पाकिस्तानशी जोडला जात आहे. भारतानं तातडीने पावलं उचलत पाकिस्तानला दणका देण्यास सुरुवात केली आहे. सर्वात आधी भारतानं दोन्ही देशांमधील सिंधू पाणी कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानी नागरिकांना देशात प्रवेश बंद करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षिततेसंदर्भात मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत कठोर निर्णय घेण्यात आले होते. त्यात सिंधू पाणी करार स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत १९६० पासून हा करार लागू होता. सिंधू नदीला पाकिस्तानची लाइफलाइन मानली जाते. तेथील जवळपास २१ कोटींहून अधिक लोक पाण्याची गरज भागवण्यासाठी सिंधू आणि तिच्या चार उपनद्यांवर अवलंबून आहे.

तसेच अटारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना या मार्गाने परतण्यासाठी १ मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

भारतातून निघून जा

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांसह देशातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अख्खा देश शोकसागरात बुडाला. हल्ल्यानंतर सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. २७ एप्रिलपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून जावे, अशा सूचना देण्यात आल्या. त्यानंतर मेडिकल व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना दोन दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली.

केंद्रातील मोदी सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेसंदर्भात मंत्रिमंडळ समितीने निर्णयांचा धडाका लावतानाच दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला दणका देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी नागरिकांसाठीची व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. याशिवाय, भारतीय नागरिकांनी पाकिस्तानात जाऊ नये, असा महत्वाचा सल्लाही सरकारने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT