Plane Catches Fire Saam TV
देश विदेश

Plane Catches Fire : भयंकर! पक्षाची धडक लागल्याने विमानाने घेतला पेट; १६९ प्रवाशी करत होते प्रवास, पुढे काय घडलं?

Accident News : आग लागल्याने विमानातील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली.

Ruchika Jadhav

Boeing 737 Plane catches Fire: अमेरिकन एयरलाइन्सच्या बोइंग -७३७ या विमानात मोठी दुर्घटना होताहोता टळली आहे. नेपाळहून दुबईच्या दिशेने येताना या विमानाला अचानक आग लागली. आग लागल्याने विमानातील प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. (Accident News)

हंस पक्षामुळे लागली आग

मिळालेल्या माहितीनुसार, विमान आकाशात असताना एका हंस पक्षाची विमानाला धडक बसली होती. ही धडक बसताच विमानाला आग लागली. त्रिभूवण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण घेतली होती. या विमानात ५० नेपाळी प्रवाशांसह एकून १६९ प्रवाशी प्रवास करत होते.

२५ मिनीट विमान आगीच्या लाटेत

पक्षाच्या धडकेत विमानाला आग लागल्यावर विमान २५ मिनीटे हवेतच उडत होते. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, तो एका ठिकाणी जात असताना आकाशात विमानाला आग लागल्याचे दिसले. विमानाला आग लागल्याची माहिती त्यांनी काठमांडू विमानतळावर दिली. त्यानंतर विमान खाली उतरवण्याचे काम सुरु झाले.

सुदैवाने मोठा अनर्थ टळला

पायलटने सांगितले की, जेव्हा विमानाला बाहेरुन आग (Fire) लागली तेव्हा विमान आकाशातच होते. आम्हाला आपातकालीन लँडींग करायचे होते. त्यामुळे त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर याची माहिती दिल्यानंतर विमान खाली उतरवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

दरम्यान सदर घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. हवाई वाहतूक सुरक्षा माहिती केंद्राच्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT