America Texas Hostage Twitter
देश विदेश

America: बंदूकधाऱ्याने चैघांना ठेवलं ओलीस; पाक दहशतवाद्याच्या सुटकेची मागणी

अमेरिकन सुरक्षा दलांला ओलीस ठेवण्यात आलेल्या चार जणांपैकी एकाची सुटका करण्यात यश आले आहे अशी माहिती समोर आली आहे. या घटनेची राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी दखल घेतली असून ते परिस्थिती नजर ठेवून आहे.

वृत्तसंस्था

अमेरिका - टेक्सासमध्ये धार्मिक कार्यक्रमात घुसून चार जणांचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. टेक्सासमध्ये या घटनेने सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेतील (America) सिनेगॉग (synagogue) या ठिकाणी सुरु असलेल्या कार्यक्रमात घुसून एका बंदूकधाऱ्याने ४ जणांना ओलीस ठेवले आहे. (America Texas Hostage)

अमेरिकन सुरक्षा दलांला ओलीस ठेवण्यात आलेल्या चार जणांपैकी एकाची सुटका करण्यात यश आले आहे अशी माहिती समोर आली आहे. या घटनेची राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी दखल घेतली असून ते परिस्थिती नजर ठेवून आहे.

हे देखील पहा -

आफियाचा भाऊ असल्याचा अपहरणकर्त्याचा दावा

प्राथमिक माहितीनुसार, बंदूकधारी व्यक्ती स्वत: ला एफबीआय एजंटच्या हत्येप्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचे सांगत आहे. तसेच बंदूकधारी व्यक्तीने आफिया सिद्दीकीच्या (Aafia Siddiki) सुटकेची मागणी केली आहे. आफिया सिद्दीकीवर अमेरिकन सैन्य अधिकाऱ्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आफिया सध्या फेडरल जेलमध्ये आहे. दुसरीकडे एफबीआयने म्हटले आहे की, त्यांना अद्याप बंदूकधारी व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', पुस्तक बॉम्बमुळे महायुतीची कोंडी

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

Success Story: अनाथाश्रमात वाढला, पैशासाठी वेटर-डिलिव्हरी बॉय झाला, पण जिद्द सोडली नाही; आज IAS ऑफिसर, वाचा संघर्षाची गाथा!

SCROLL FOR NEXT