America Saved Khalistani Gurpatwant Singh Pannun Saam Tv
देश विदेश

America Saved Khalistani : खलिस्तानी दहशतवाद्याला अमेरिकेने वाचवलं, भारताला दिला इशारा; अहवालात माहिती उघड

Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी दहशतवाद्याला अमेरिकेने वाचवलं, भारताला दिला इशारा; अहवालात माहिती उघड

Satish Kengar

America Saved Khalistani :

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नू याला संपवण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र अमेरिकेने त्याला वाचवलं आहे, अशी माहिती एका अहवालातून समोर आली आहे. फायनान्शिअल टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन अधिकार्‍यांनी अमेरिकन भूमीवर शीख खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. पन्नू हा अमेरिकन आणि कॅनडाचा नागरिक असून तो शीख फॉर जस्टिसचा जनरल काउंसिल आहे.

वेगळ्या खलिस्तानची मागणी करणारा हा अमेरिका येथील गट आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची या वर्षी 18 जून रोजी ब्रिटिश कोलंबियामध्ये हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होतो. यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यात भारतीय गुप्तचर संस्थांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. भारताने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमेरिकन फेडरल वकिलांनी पन्नू प्रकरणातील एका गुन्हेगाराविरुद्ध न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात कट रचल्याबद्दल सीलबंद आरोपपत्र दाखल केले आहे. सध्या अमेरिकेचे जस्टिस डिपार्टमेंट आरोपपत्र उघडायचे आणि आरोप सार्वजनिक करायचे की नाही, यावर विचार करत आहे. यासोबतच निज्जरच्या हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याबद्दलही विचार केला जात आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, 'असं बोललं जात आहे की, ज्या व्यक्तीवर आरोप आहे, तो अमेरिकेतून निघून गेला आहे.'  (Latest Marathi News)

या प्रकरणावर भाष्य करण्यास एफबीआयने (FBI) दिला नकार

वृत्तानुसार, अमेरिकन जस्टिस डिपार्टमेंट आणि एफबीआयने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या वतीने असे सांगण्यात आले की, अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांशी चालू असलेल्या कायदेशीर बाबींवर किंवा खाजगी राजनैतिक चर्चेवर भाष्य करत नाही. मात्र, अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता राखणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असेही सांगण्यात आले.

दरम्यान, खलिस्तानी दहशवादी निज्जरच्या हत्येबाबत कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपांमुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. भारताने ट्रुडो यांचे आरोप मूर्खपणाचे ठरवून फेटाळले होते. काही दिवसांनंतर, भारताने जाहीर केले आहे की, ते कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करत आहे.

तसेच कॅनडाने भारतातील आपल्या राजदूतांची संख्या कमी करण्यास सांगितले होते. भारताने कॅनडाला आपल्या भूमीतून कार्यरत दहशतवादी आणि भारतविरोधी घटकांवर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT