Donald Trump NEWS Saam tv
देश विदेश

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

Donald Trump NEWS : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात धक्कादायक पोस्ट केली आहे. ट्रम्प यांच्या पोस्टमुळे जगात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

अमेरिका-इराणमध्ये पुन्हा तणाव वाढला

डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला मोठा इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टमुळे जगात खळबळ

अमेरिका आणि इराणमधील युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात होण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला डिवचण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा इराणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करताना इराण नकाशावर अमेरिकेचा ध्वज दाखवलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगात खळबळ उडाली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टवर कोणतंही मोठं लिखीत भाष्य केलेलं नाही. परंतु इराणच्या नकाशावर थेट अमेरिकेचा ध्वज दर्शवला आहे. फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'युनायटेड स्टेट्‍स ऑफ मिडिल ईस्ट'.

काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण एकमेकांविरोधात टीका करताना दिसत आहे. दोन्ही देशाच्या नेत्यांकडून एकमेकांना धमक्या देत आहेत. त्याचदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा मोठा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे जगातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. टम्प यांच्या पोस्टवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्टवर लोकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला. काही लोकांच्या म्हणण्यांनुसार, अमेरिका त्यांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिका शक्तिशाली असल्याचा इशारा ट्रम्प यांना इराणला द्यायचा आहे. इराणवर दबाव आणण्यासाठी ही पोस्ट केल्याचा अनेकांचा दावा आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, ट्रम्प यांच्या पोस्टमुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे'.

तत्पूर्वी, पश्चिम आशियातील तणावजन्य परिस्थितीदरम्यान पाकिस्तानी लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी इराणचा दौरा केला होता. स्थानिक वृत्तसंस्थाच्या रिपोर्टनुसार, मुनीर यांनी तेहरानमध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष मसून पेजेशकियान, परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबफ यांची भेट घेऊन चर्चा केली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रश्न सोडवायचा आहे की चिघळायचा आहे..हे सरकारने ठरवायचे - राज ठाकरे

Raj Thackeray: मोठी बातमी! २६ जुलै रोजी ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

Fish bone in throat: माशाचा काटा घशात अडकला, संसर्ग वाढत गेला आणि अचानक हार्ट अटॅक; डॉक्टरांच्या मेहनतीने रूग्णांचा वाचला जीव

Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Delhi Protest: दिल्लीत संसदभवन परिसरात आंदोलन, विरोधक-सत्ताधारी आमने-सामने; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT