Georgia school Firing: अमेरिकेतील जॉर्जिया येथील हायस्कूलमध्ये एका विद्यार्थ्याने वर्गात गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले. गोळीबार करणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्याचे कारण अद्याप समोर आले नसून राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? वाचा सविस्तर...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जॉर्जियातील एका हायस्कूलमध्ये सहकारी विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात दोन विद्यार्थ्यांसह चार जण ठार तर नऊ जण जखमी झाले आहेत. संशयित हल्लेखोर विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कोल्ट क्रे असे या १४ वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.४५ वाजता वर्गात गोळीबार झाला.
आरोपी मुलगा जॉर्जियातील विंडर येथील अपलाची हायस्कूलचा विद्यार्थी आहे. मृतांमध्ये दोन विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा समावेश आहे. या गोळीबाराचे कारण शोधण्यात पोलीस अधिकारी व्यस्त आहेत. तसेच या विद्यार्थ्याला हल्ल्यासाठी प्रवृत्त केले होते का? याचाही शोध घेत आहेत. शाळेत घडलेल्या या घटनेने विद्यार्थी तसेच पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळी झाडणारा विद्यार्थी हल्ल्यापूर्वी वर्गात शांत बसला होता. गोळीबार सुरू होताच वर्गातील इतर विद्यार्थ्यांनी डेस्कच्या मागे लपून आपला जीव वाचवला. एकामागून एक गोळ्यांच्या अनेक राऊंडचे आवाज ऐकू येत होते. अनेकांनी जमिनीवर झोपत एकमेकांचे संरक्षण केले. या घटनेने विद्यार्थ्यांचा आरडाओरडा अन् किंचाळ्या ऐकायला मिळाल्या.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घटनेचा निषेध केला असून गोळीबाराच्या घटनेत बळी पडलेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अमेरिकेत भविष्यात बंदूक हिंसाचार रोखण्यासाठी तोफा सुरक्षा कायद्यांची मागणी केली आहे. भविष्यात बंदुकीच्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी अमेरिकेत बंदूक सुरक्षा कायद्याची मागणी होत आहे. ही घटना भयावह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.