America Attack On Iran Saam Tv
देश विदेश

America Attack On Iran: अमेरिकेचा इराणवर आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला, 'ऑइल हब' असलेले खार्ग बेट उद्ध्वस्त

US launches massive strike on Iran’s Kharg Island: अमेरिकेने इराणी अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने इराणच्या 'ऑइल हब' असलेल्या खार्ग बेटावर हल्ला करत ते उद्ध्वस्त केले.

Priya More

Summary -

  • अमेरिकेचा इराणच्या खार्ग बेटावर मोठा हवाई हल्ला केला

  • ९० पेक्षा जास्त लष्करी तळ लक्ष्य केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

  • हा इराणवरील अमेरिकेचा आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला आहे

  • खार्ग बेट हे इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धादरम्यान इराणला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेने इराणच्या ऑइल हबवर भीषण हल्ला केला. तेल निर्यात केंद्र खार्ग बेटावर अमेरिकेने लष्करी हल्ला केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यूएस सेंट्रल कमांडनुसार, शनिवारी रात्री अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यात ९० हून अधिक इराणी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रदेशाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ला असल्याचे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणच्या खार्ग बेटावरील लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या हल्ल्यात नौदल खाण साठवणूक केंद्रे, क्षेपणास्त्र बंकर आणि अनेक महत्त्वाची लष्करी ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या कारवाईदरम्यान तेलाशी संबंधित पायाभूत सुविधांना कोणतेही नुकसान झाले नाही असा दावा अमेरिकेने केला आहे.

खार्ग बेट हे इराणचं सर्वात मोठं तेल निर्यात केंद्र आहे. खार्ग बेट हे इराणसाठी आर्थिक आणि धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे. इराणच्या एकूण कच्चे तेल निर्यातीपैकी ९० टक्के व्यापार याच बेटावरून होतो. त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था कमकुवत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेने खार्ग बेटावर केलेला हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.Iran

दरम्यान, आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रमुख जागतिक शक्तींना होर्मुझच्या सामुद्रधुनीत त्यांच्या नौदल जहाजे तैनात करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका हा महत्त्वाचा सागरी मार्ग कोणत्याही परिस्थितीत खुला ठेवेल. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली की, इराणने या जलमार्गाला रोखण्याच्या प्रयत्नांमुळे प्रभावित झालेले अनेक देश सुरक्षित शिपिंग करण्यासाठी युद्धनौका पाठवण्यासाठी अमेरिकेसोबत येण्याचा निर्णय घेतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

Pune Crime: गुरांच्या गोठ्यात ४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, लैंगिक अत्याचारानंतर चिमुरडीची हत्या

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: राज्यातील १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र; ५४ लाख बहिणींना नाही मिळणार १५०० रुपये

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

SCROLL FOR NEXT