Donald Trump news  Saam Tv
देश विदेश

ट्रम्पचा फुगा अमेरिकेनंच फोडला; इराण बलशाली अमेरिकी अधिकाऱ्यांचीच कबुली

इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांचा फुगा अमेरिकेनंच फोडलाय. इराण बलशाली असल्याची थेट कबुली अमेरिकी अधिकाऱ्यांनीच दिलीय. या अधिकाऱ्यांनी महासत्तेच्या अध्यक्षांनाच कसं तोंडघशी पाडलंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

इराण विरोधातील युद्धात इस्रायल आणि अमेरिकेनं कितीही प्रखर आक्रमक हल्ले केले तरी इराण तसूभरही खचला नाही हे जगानं पाहिलं. महासत्तेच्या प्रमुखानं केलेल्या सर्व दाव्यांची इराणनं आपल्या लष्करी माऱ्यानं हवाच काढली. युद्ध सुरु झाल्यापासून दररोज सकाळी डोनाल्ड ट्रम्प आपल्या सैन्याचं मनोबल वाढावं आणि इराणला घाबरवण्यासाठी अनेक दावे करत असले इशारे देत असले तरी त्यांच्या सगळ्यां दाव्यांची खुद्द अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंच हवा काढलीय, या अधिकाऱ्यांनी महासत्तेच्या अध्यक्षांनाच कसं तोंडघशी पाडलं पाहा,

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार अमेरिकेनं इराणचं लष्करी नेतृत्व कमकुवत केलं असलं तरी क्षेपणास्त्रांचे साठे अद्यापही सुरक्षित आहेत.

अमेरिकेने 12300 हून अधिक लक्ष्यांवर हल्ले करूनही, इराणच क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सुरक्षित आहेत.

इराणची मोठ्या संख्येने असलेली किनारी क्रूझ क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यातून वाचली आहेत.

एकंदरीत, इराणकडे अजूनही मोठ्या संख्येने क्षेपणास्त्रे असून त्यांना पूर्णपणे कमकुवत मानता येणार नाही.

युद्ध सुरु होताच खामेनींना मारुन अमेरिका आणि इस्रायलनं इराणला नेतृत्त्वहीन केलं. पण नेतृत्त्व नसूनही इराण इंचभरही मागे हटला नाही उलट एकट्या इराणंनं आपल्या अफाट लष्करी ताकदीनं बलाढ्य अमेरिका आणि इस्रायलसोबतच आखातीतील ८-१० देशांवर हल्ले करुन अमेरिकेच्या नाकीनऊ आणले.

आता आता तर ट्रम्प यांच्या सगळ्याच दाव्याची पोलखोल केली. याआधीही अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्या या युद्धखोर भूमिकेमुळे राजीनामा देऊन शस्त्र टाकली होती. तर दुसरीकडे या युद्धात नाहक अमेरिका भरडली जाते असा आरोप करत अमेरिकेच्या नाक्यानाक्यावर ट्रम्प यांना विरोध होतोय. आता युद्धाचं काय होतं ते कळेलच पण ट्रम्प यांची जगात नाचक्की झाली ऐवढं मात्र खरं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT