Russia-Ukraine war  Yandex
देश विदेश

Russia- Ukraine War: रशियाला मदत करणाऱ्या देशांवर अमेरिकेकडून कारवाई; भारताच्या चार कंपन्यांवर निर्बंध

Russia- Ukraine War: भारतीय कंपन्यांच्या ४०० संस्थांवर आणि व्यक्तींवर अमेरिकेने कारवाई करण्यात आलीय.

Bharat Jadhav

युक्रेन आणि रशियाच्या युद्धात रशियाला मदत करणाऱ्या साधारण ४०० संस्था आणि व्यक्तींवर अमेरिकेने निर्बंध लावलेत. यात भारताच्या चार कंपन्यांची नावे आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, तिसऱ्या देशाच्या चोरीला रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आलीय. साधरण ४०० संस्थाच्या आणि व्यक्तींवर निर्बंध लावण्यात आलेत. जे रशिया-युक्रेनच्या युद्धाला प्रोत्साहन देताहेत. यात १२० पेक्षा अधिक व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध लावण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिलीय.

यासह ट्रेझरी विभागाने २७० पेक्षा अधिक लोकांना आणि कंपन्यांना नांमाकित करण्यात आलेत. वाणिज्य विभागाने ४० नव्या कंपन्यांना आपली यादीत समाविष्ट केलंय. या कंपन्यांमध्ये एसेंड एविएशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा देखील समावेश आहे. यात मार्च २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान रशियाच्या कंपन्यांना ७०० पेक्षा अधिक वस्तू पाठवल्या.

या वस्तूंमध्ये अमेरिकेच्या विमानाचे काही भाग होते. याची किमत २००००० डॉलरपेक्षा जास्त आहे. यासह मास्क ट्रान्स नावाची अजून एक कंपनीचा देखील यात समावेश आहे. या कंपनीकडून ७ इंजिनिअरिंगला ३०००,००० डॉलर किमतीच्या विमानाच्या भाग पाठवले होते.

अमेरिकेने 'TSMD ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'Futrevo' सारख्या कंपन्यांना देखील नाव दिले आहे.त्यांनी रशियन कंपन्यांना गंभीर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा केलाय. या वस्तूंची किमत १.४ मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. अमेरिकेनुसार, ही कारवाई फक्त रशियाला मदत करणाऱ्या कंपन्यांवर करण्यात आलीय. जेणेकरून कंपन्यांना मदत मिळणार नाही. दरम्यान याआधीही भारतीय कंपन्यांवर निर्बंध लावण्यात आलीत आहेत.

नोव्हेंबर २०२३ मध्ये एसआय मायक्रोसिस्टम्सला रशियाच्या सैन्याला अमेरिकेच्या वस्तू दिल्या होत्या. काही दिवसापुर्वीच अमेरिकी राजदूत एरिक गार्सेटीने नुकताच इशारा दिला होता की, जी भारतीय कंपनी रशियाला मदत करून जागितक निर्बंधांचे उल्लंघन करेल त्यांना त्याच्या परिणाम भोगण्याची तयारी ठेवावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

SCROLL FOR NEXT