US Signs Oil Deal with Pakistan saam tv
देश विदेश

India-US Relation: अमेरिकेची दादागिरी; आधी टॅरिफ ब्लॅकमेलिंग, आता पाकसोबत डील

US Signs Oil Deal with Pakistan: अमेरिकेने भारताच्या शत्रूला मदत करुन भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय. मात्र अमेरिकेची दादागिरी आणि टेरिफच्या नावावर सुरु असलेल्या ब्लॅकमेलिंगचा भारतावर नेमका काय परिणाम होणार? पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

  • अमेरिका-भारत व्यापार तणाव वाढले; २५ टक्के आयात शुल्क लावले.

  • अमेरिकेने पाकिस्तानसोबत तेल करार करत भारताला धक्का दिला.

  • ट्रम्प यांनी पाकिस्तानातील तेल भांडाराच्या विकासासाठी योजना आखली.

  • भारताच्या राजकीय वर्तुळात अमेरिका 'मित्र की शत्रू?' यावर चर्चा सुरु.

मित्र म्हणवणाऱ्या अमेरिकेने भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय.. भारतावर 25 टक्के आयात शुल्क लावल्यानंतर अमेरिकेने भारताचा शत्रू पाकिस्तानसोबत तेल करार करत भारताच्या जखमेवर मीठ चोळलंय. तर पाकिस्तानातील विशाल तेल भांडाराच्या विकासाची योजनाच ट्रम्प यांनी आखलीय.

एवढंच नाही तर इराणी कंपन्यांसोबत व्यापार करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादलेत. तर अमेरिकेला गरज असलेल्या सेवा क्षेत्र वगळता फक्त वस्तुंवरच टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतलाय. त्यावरुन संजय राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टेरिफ आणि रशियासोबत व्यापार सुरु ठेवल्यास 1 ऑगस्ट पासून दंड लादण्याची घोषणा केलीय. त्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर पियुष गोयल यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भारताने अमेरिकेच्या ब्लॅकमेलिंगविरोधात नवी रणनीती बनवलीय. मात्र ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? पाहूयात.

अमेरिकेच्या टेरिफमुळे GDP वर 0.06 टक्के परिणाम

124 अब्ज $ पैकी 112 अब्ज $ ची तूट इंग्लडसोबतच्या व्यापारातून भरुन निघणार

अमेरिकेचा शत्रू असलेल्या रशिया- चीनसोबतचे संबंध सुधारण्याची शक्यता

सातत्याने भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करणाऱ्या ट्रम्पने आता भारताविरोधात टॅरिफ युद्ध छेडलंय... त्यामुळे अमेरिकेसारख्या महासत्तेला झुकवण्यासाठी व्यापाराचे नवे पर्याय उभे करुन भारताने अमेरिकेचे नापाक मनसुबे उधळून लावायला हवेत.

अमेरिकेने भारतावर कोणते शुल्क लावले आहे?

अमेरिकेने भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावले आहे.

अमेरिकेने पाकिस्तानबरोबर कोणता करार केला?

अमेरिकेने पाकिस्तानसोबत विशाल तेल भांडाराच्या विकासासाठी करार केला आहे.

भारताने यावर काय प्रतिक्रिया दिली?

भारतात या निर्णयावरून तीव्र संताप व्यक्त होत असून अमेरिकेवर ‘पाठीमागून खंजीर खुपसल्याचा’ आरोप होत आहे.

या घडामोडीचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक आणि राजनैतिक धोरणांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीपात्रात पुन्हा मळी मिश्रित पाणी सोडण्याचा प्रकार समोर

Narali Bhat Recipe: या नारळी पौर्णिमेला नक्की बनवा झटपट टेस्टी नारळी भात रेसिपी

Akola : अकोला पोलिसात खळबळ; कारवाई टाळण्यासाठी मागितली खंडणी, पोलिसांसह सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल

Sanjay Shirsat : सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचं वक्तव्य चर्चेत

Pune Crime : कॅफेमधील 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या

SCROLL FOR NEXT