US UK Airstrikes on Houthi Saam TV
देश विदेश

Houthi Attack: अमेरिकन फायटर जेट्सचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त

US Airstrikes: लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केली आहे.

Satish Daud

US UK Airstrikes on Houthi

लाल समुद्रातील व्यापारी जहाजांना लक्ष्य करणाऱ्या हुथी बंडखोरांवर अमेरिका आणि ब्रिटनने मोठी कारवाई केली आहे. दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये हुथी बंडखोरांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यांची अनेक ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. या हवाई हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव वाढण्याची शक्यता आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इस्त्रायल-हमास युद्धानंतर हुथी बंडखोर पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांना लक्ष्य करत होते. १९ नोव्हेंबर २०२३ पासून, हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील तब्बल जहाजांवर २७ वेळा हल्ले केले होते. (Latest Marathi News)

त्यामुळे आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सुरक्षेवर परिणाम होत होता. अमेरिकन नौदलाने अनेक वेळा हुथी बंडखोरांचे हल्ले हाणून पाडले होते. हुती बंडखोरांनी हे हल्ले थांबवले नाहीत तर त्याचे मोठे परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेने दिला होता.

इतकंच नाही, तर आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने पाळत देखील ठेवली होती. हुथी बंडखोरांचे समुद्री हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल देखील सज्ज झाले होते. भारताने आपल्या ५ युद्धनौका अरबी समुद्र आणि लाल समुद्रात तैनात केल्या होत्या.

दरम्यान, येमेनच्या हुथी बंडखोरांनीही गुरुवारी उशिरा लाल समुद्रातील बोटींवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनने इराण समर्थक हुथी बंडखोरांविरुद्ध युद्ध घोषित केले.

अमेरिकन आणि ब्रिटिश सैन्याने हुथी बंडखोरांवर हवाई हल्ले केले आहेत. क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांचा वापर करून, दोन्ही देशांच्या सैन्याने येमेनमधील अनेक हुथी स्थाने नष्ट केली. या हवाई हल्ल्यांमध्ये हुथी बंडखोरांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT