देश विदेश

High Court : लग्नाचं वचन देऊन दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले तर तो बलात्कार नसतो: हायकोर्ट

Bharat Jadhav

इलाहाबाद हायकोर्टने एका प्रेम प्रकरणासंदर्भात मोठा निर्णय दिलाय. परस्पर संमतीने दीर्घ कालावधीसाठी केलेला व्यभिचार (विवाहित लोकांमधील संबंध) हा बलात्काराच्या श्रेणीत येत नाही. यात फसवणुकीचा कोणताच प्रकार नसतो, असं निरीक्षण नोंदवत कोर्टाने महिलेने केलेला बलात्काराचा आरोप खोडून काढलाय.

लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एक महिलेने केला होता. तिच्या तक्रारीवरुन फौजदारी खटला दाखल करण्यात आला होता. श्रेय गुप्ता नावाच्या व्यक्तीने आरोपविरुद्धात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती अनिश कुमार गुप्ता यांनी मुरादाबाद न्यायालयात प्रलंबित असलेला फौजदारी खटला रद्द केला. महिलेच्या तक्रारीवरून याचिकाकर्त्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पतीच्या मृत्यूनंतर सुरू झालं होतं प्रेम प्रकरण

पतीच्या मृत्यूनंतर याचिकाकर्त्याने लग्नाच्या बहाण्याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता. मुरादाबादच्या महिला पोलीस ठाण्यात या गुन्हाची नोंद करण्यात आली होती. महिलेने दावा केला की, श्रेय गुप्ताने तिला अनेकवेळा लग्नाचे वचन दिले होते, परंतु नंतर त्याने ते वचन मोडले आणि तो दुसऱ्या महिलेच्या संपर्कात आला. तसेच सेक्स व्हिडीओ जारी न करण्यासाठी गुप्ता यांनी तिच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला होता.

13 वर्षांपासून संबंध

महिलेच्या तक्रारीवरून कनिष्ठ न्यायालयाने ९ ऑगस्ट २०१८ रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. त्यानंतर आरोपपत्र आणि संपूर्ण फौजदारी खटला रद्द करण्याची विनंती करत आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर खरी परिस्थिती समोर आली. या प्रकरणाचा सखोल माहिती घेतल्यानंतर न्यायालयाला असे आढळून आले की, तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध सुमारे १२-१३ वर्षे चालू होते. विशेष म्हणजे महिलेचा पती हयात असल्यापासून या दोघांचे संबंध होते.

हा व्यक्ती तिच्या नवरा जेथे काम करत होता त्याच कंपनीत काम करत होता. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले होते, त्याचं वय महिलेच्या वयापेक्षा खूप कमी आहे. तक्रारदार महिलेने त्या व्यक्तीवर अवाजवी प्रभाव टाकला होता. दरम्यान, नईम अहमदविरुद्ध हरियाणा राज्य या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत उच्च न्यायालयाने लग्नाच्या प्रत्येक तुटलेल्या वचनाला खोटे वचन मानणे आणि एखाद्या व्यक्तीवर बलात्काराच्या गुन्ह्यासाठी खटला चालवणे मूर्खपणाचे ठरेल, असं म्हटलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi Vadra : अखेर काँग्रेसने डाव टाकला; प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री, उमेदवारी जाहीर,VIDEO

Maharashtra News Live Updates: 225 बोपदेव घाट सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट; आरोपीकडून दांडके आणि कपडे जप्त

Atul Parchure Last Video : अतुल परचुरेंची राज ठाकरेंसाठी अखेरची पोस्ट; एकेक शब्दात दिसत होती तळमळ, बघा VIDEO

Bomb Threat: चार विमानांमध्ये बॉम्ब असल्याची माहिती; एअर इंडियाचं विमान कॅनडात तर एअर इंडिया एक्सप्रेस उतरलं आयोध्येत

Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT