Gyanvapi Masjid Case Saam Tv
देश विदेश

Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी सर्वेक्षणाबाबत मोठी अपडेट, मस्जिद कमिटीची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Gyanvapi Masjid News: ज्ञानवापी परिसरात पुरातत्व विभागाला पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याची कोर्टाने परवानगी दिली आहे.

Priya More

Gyanvapi Case Update: ज्ञानवापी मस्जिदबाबत (Gyanvapi Masjid case) मोठी अपडेट समोर आली आहे. अलाहाबाद हायकोर्टाने ज्ञानवापी मस्जिदच्या सर्वेक्षणाबाबत (Dnyanvapi Survey) मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने अंजुमन इन्तजामिया मस्जिद कमिटीची याचिका फेटाळून लावली. तसंच, ज्ञानवापी परिसरात पुरातत्व विभागाला पुन्हा सर्वेक्षण सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्वेक्षण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हायकोर्टाच्या निर्णयामुळे मुस्लिम कमिटीला (Muslim Committee) मोठा झटका बसला आहे.

ज्ञानवापी परिसराच्या एएसआय सर्वेक्षणावर अलाहाबाद हायकोर्टाने गुरुवारी मोठा निर्णय दिला. हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या निर्णयानंतर आता ज्ञानवापी परिसराचे एएसआय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्ञानवापीच्या निर्णयाकडे संपू्र्ण देशाचे लक्ष लागले होते. वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कुमार विश्वेश यांनी ज्ञानवापी सर्वेक्षणाचे आदेश दिले होते. आता अलाहाबाद हायकोर्टाने जिल्हा न्यायालयाचा निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षण होणार आहे.

हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता ज्ञानवापी परिरातील एएसआय सर्वेक्षणावरील बंदीही हटवण्यात आली आहे. आता एएआयकडून सर्वेक्षणाचे काम कधीही सुरू केले जाऊ शकते. अलाहाबाद हायकोर्टाने याचिका फेटाळल्यामुळे मुस्लिम कमिटीला धक्का बसला आहे. आता मुस्लिम कमिटी हायकोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याच्या तयारीमध्ये आहेत. लवकरच मुस्लिम कमिटी एएसआय सर्वेक्षण थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी परिसरातील सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या निर्णयाविरोधात मस्जिद कमिटीने 21 जुलै रोजी अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्ञानवापी सर्वेक्षण प्रकरणावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर मुख्य न्यायमूर्ती प्रितिनकर दिवाकर यांच्या खंडपीठाने 27 जुलै रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. तसंच निर्णय येईपर्यंत ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेक्षणाला कोर्टाने स्थगिती दिली होती. पण आता हायकोर्टाने सर्वेक्षणावरील स्थगिती उठवत मस्जिद कमिटीला मोठा झटका दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावर अंघोळ करायला गेलेला व्यक्ती बुडाला

Sim Card Facts: मोबाइल सिमकार्डमध्ये सोनं असतं? जाणून घ्या सत्य

९५ CCTV पाहून पोलिसही दमले! ७ घरफोड्यांचा मास्टरमाईंड अखेर कचाट्यात सापडला

Crime News: ऑनलाईन ओळख, लग्न आणि गळफास...! लग्नाच्या एका महिन्यानंतर सॉफ्टवेयर इंजिनिअरची आत्महत्या, वाचा काय प्रकरण

Gold Rate: सोनं चमकलं! सोन्याच्या दरात २०८०० रुपयांनी वाढ, सुवर्णनगरीत आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT