ALLAHABAD HIGH COURT ON ADULT DAUGHTER’S RIGHT TO LIVE INDEPENDENTLY saam tv
देश विदेश

मुलीला आई वाडिलांसोबत राहण्यासाठी दबाव टाकता येणार नाही; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

Allahabad HC Upholds Adult Daughter’s Right to Make Her Own Living Choices: अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल देताना सज्ञान मुलीला पालकांसोबत राहण्याची सक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मुलीला कुठे आणि कोणासोबत राहायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे कोर्टाने नमूद केले.

Omkar Sonawane

आपल्या मुलीचा ताबा मिळवण्यासाठी आईने कोर्टात याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळत सदर महिलेला मोठा झटका दिला. एखादी सज्ञान मुलगी स्वेच्छेने कुठेही आणि कोणासोबतही राहू शकते. तिच्यावर तिच्या पालकांचा कुठलाही दबाव असू शकत नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा अलाहाबाद कोर्टाने दिला आहे. सज्ञान मुलीला आपण कुठे आणि कोणासोबत राहायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

नेमके प्रकरण काय?

अलाहाबाद कोर्टात एका महिलेने तिच्या 25 वर्षीय मुलीला घरी आणण्यासाठी हेबियस कोपर्स याचिका दाखल केली होती. आईची इच्छा होती की तिच्या मुलीने तिच्यासोबत घरी राहावे. मात्र मुलीने आईसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती संदीप जैन यांच्या खंडपीठासमोर झाली. कोर्टाने 17 ऑगस्टला मुलीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मुलीला कोर्टात आणण्यात आले.

मुलीने कोर्टात स्पष्ट सांगितले की, दिल्लीमध्ये मी स्वतंत्रपणे राहते. मला त्या ठिकाणी जबरदस्ती कोणीही नेले नाहीये. आईसोबत राहण्याची इच्छा नसल्याचे सांगत तिने आपल्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण झाल्याचा आरोप आईवर केला. मात्र, आईने हे आरोप फेटाळून लावत मुलीने आपल्यासोबत राहावे अशी इच्छा व्यक्त केली. मुलीशी प्रत्यक्ष बोलल्यानंतर कोर्टाने ती सज्ञान आणि स्वतःनिर्णय घेण्यास सक्षम असल्याचे नमूद केले. तिची आईसोबत राहण्याची अजिबात इच्छा नाहीये असे कोर्टाने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Burning Feet: पायाचे तळवे अचानक गरम होतात, 'या' ३ आजारांचे असू शकते लक्षण

Maharashtra News Live Update: ठाणे शहरातील चिंतामणी चौकातील एका दुकानाला भीषण आग

राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील दोन दिग्गज महिला नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

ज्ञानेश कुमारांना राष्ट्रपतींएवढं कायदेशीर संरक्षण; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवणं कठीण?

SCROLL FOR NEXT