Booster Dose Saam Tv
देश विदेश

बुस्टर डोसबाबत आरोग्य मंत्र्यांची महत्वाची माहिती

आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करुन माहिती दिली.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : परदेशात जाणारे नागरिक आणि विद्यार्थी आवश्यक्तेनूसार बुस्टर डोससाठी पात्र आहेत. ही माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट (Tweet) करुन दिली. "परदेशात प्रवास करणारे भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आता त्या देशांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बुस्टर डोस घेऊ शकतात." १८ वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्वजण, ज्यांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. ते बुस्टर डोस (Vaccine) घेण्यास पात्र आहेत, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

या अगोदर सल्लागार समितीने शिफारस केली होती. यात ज्यांना परदेशात जाण्याची गरज आहे, त्यांनी नऊ महिन्यांच्या अंतरापूर्वी, ते ज्या देशात प्रवास करत आहेत, त्या देशाच्या नियमांनुसार लसीचे (Vaccine) बुस्टर डोस घेऊ शकतात.

या मुद्द्यावर याअगोदरही चर्चा करण्यात आली होती. ज्यांना परदेशात प्रवास करण्याची आवश्यकता आहे त्यांनी नऊ महिन्यांच्या प्रतीक्षा कालावधीपूर्वी बुस्टर डोस घेऊ शकता, अशी एनटीएजीआय'ने शिफारस केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार देशातील अजूनही काहीच लोकांनी कोरोना लसीचा बुस्टर डोस घेण्याची इच्छा व्यक्त केली. तर सरकारने १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांना बुस्टर डोस घेण्याची परवानगी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT