UP Elections: तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातच सपचे सरकार येईल - अखिलेश यांचा दावा - Saam TV
देश विदेश

UP Elections: तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातच सपचे सरकार येईल - अखिलेश यांचा दावा

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने पहिल्या दोन टप्प्यातच शंभरचा आकडा पार केला आहे. तिसऱ्या-चौथ्या टप्प्यातच समाजवादी पक्षाच्या सरकारवर शिक्कामोर्तब होईल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे

वृत्तसंस्था

करहाल/फिरोजाबाद : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने पहिल्या दोन टप्प्यातच शंभरचा आकडा पार केला आहे. तिसऱ्या-चौथ्या टप्प्यातच समाजवादी पक्षाच्या सरकारवर शिक्कामोर्तब होईल, असा दावा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे. (Akhilesh Yadav claims pune victory in Up Elections)

उत्तर प्रदेशमध्ये (UP Elections) विधानसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. या टप्प्यात सुमारे ११३ मतदारसंघात मतदान झाले आहे. आता लक्ष तिसऱ्या टप्प्याकडे लागले आहे. त्यामुळे सर्व प्रमुख नेत्यांकडून तिसऱ्या टप्प्यांत अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. करहाल येथे अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि मुलायम सिंह यादव यांनी एका सभेला मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना अखिलेश म्हणाले की, मुलायमसिंह यांनी समाजवादी पक्षाला उंचीवर नेऊन ठेवले असून त्यांनी सुरू केलेले आंदोलन पुढे नेण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.

केंद्रीय मंत्री एस.पी. बघेल यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलताना अखिलेश यादव म्हणाले, की भाजप (BJP) हा सर्वाधिक खोटे बोलणारा पक्ष आहे. भाजपने आपले नाव बदलायला हवे. भारतीय जनता पक्ष नव्हे तर ‘भारतीय झगडा पार्टी’ असे नाव द्यायला हवे. जनतेकडून या पक्षाला पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र आहे. सहानुभूती मिळवण्यासाठी हे काहीही करू शकतात. आमच्या समर्थकांना पक्षाच्या आघाडीने पहिल्या दोन टप्प्यांतच शंभरी गाठल्याचा अंदाज आला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात समाजवादी पक्ष स्थापनेचा मार्ग मोकळा होईल, असा दावा त्यांनी केला.

सातव्या टप्प्यांपर्यंत भाजपच्या बूथवर सन्नाटा पसरेल आणि भूत नाचतील. बूथवर माशी मारणारा देखील कोणी नसेल, असेही अखिलेश म्हणाले. फिरोजाबादच्या सभेत अखिलेश यादव म्हणाले, की आमचे सरकार जनतेला पौष्टिक आहार देईल. आम्हाला जर गरिबांना मोफतपणे तूप, मोहरीचे तेल वाटण्याची वेळ आली तर ते देखील देऊ. शहरातील गरीब मजुरांना उपाशीपोटी राहावे लागत आहे. आम्ही त्यांच्यासाठी कॅन्टीन उभारू आणि दहा रुपयात समाजवादी थाळी देऊ.

शेतकरी, तरुण आणि व्यापारी तिघे एकत्र येऊन देशाला बलशाली करतील. जनता देखील मोठ्या अपेक्षेने येथे आली आहे. लोकांची पत आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी समाजवादी पक्षाचे सरकार काम करेल. केवळ समाजवादी पक्षच हे क काम करू शकते, अन्य पक्ष नाही - मुलायम सिंह यादव, समाजवादी पक्षाचे नेते

Edieted By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT