salman chishti arrested ANI
देश विदेश

Nupur Sharma : नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी; सलमान चिश्ती पोलिसांच्या ताब्यात

राजस्थानच्या अजमेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजमेर : नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण पैसे घर देऊ असं भडकावू वक्तव्य करणाऱ्या खादिम सलमान चिश्ती याला अटक करण्यात आली आहे. राजस्थानच्या अजमेर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अजमेरच्या दर्ग्यामधील खादिम सलमान चिश्ती याने भाजपमधून निलंबित झालेल्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात भडकावू विधानं केली होती. (Nupur Sharma Latest News)

नुपूर शर्मा यांचा शिरच्छेद करणाऱ्याला आपण आपलं घर देणार असं त्याने जाहीर केलं होतं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उदयपूरमध्ये टेलर कन्हैया लालच्या हत्येआधी तयार करण्यात आलेल्या व्हिडीओप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ असल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

अजमेरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विकास सांगवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, खादीम सलमान चिश्ती याला मंगळवारी रात्री 12 वाजता 45 मिनिटांनी अटक करण्यात आली. सलमान चिश्ती याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. Nupur Sharma Marathi News)

कोण आहे सलमान चिश्ती?

सलमान चिश्ती हा राजस्थानमधील अजमेरच्या दर्ग्यामधील खादिम आहे. तो एक हिस्ट्री शीटर सुद्धा आहे. त्याच्यावर अजमेरच्या दरगाह पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्यानं केलेल्या प्रक्षोभक विधानामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या समर्थना पोस्ट करणाऱ्या दोघांची हत्या आतापर्यंत झाली आहे. उदयपूरच्या कन्हैया लालच्या हत्येनं संपूर्ण देश हादरलाय. तर या हत्येचा व्हिडीओ समोर आलाय. या हत्येआधी सोशल मीडियात पोस्ट करत कन्हैया लाल याची हत्या करु, अशी चिथावणी देण्यात आली होती. त्यानंतर कन्हैय्या लालच्या मारेकऱ्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT