NCP Vs BJP Arunachal Pradesh Vidhansabha Election
NCP Vs BJP Arunachal Pradesh Vidhansabha Election saam Tv
देश विदेश

NCP Vs BJP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(प्रमोद जगताप, नवी दिल्ली)

Arunachal Pradesh Vidhansabha Election NCP vs BJP :

राज्यात हातात हात घालून निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपने जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आलाय. लिका सय्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यांनी ही भाजपवर आरोप करत तक्रार दाखल केलीय. (Latest News)

लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महाराष्ट्रात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये एकता असल्याचं दाखवलं जात आहे. अशात अरुणाचल प्रदेशात या दोन्ही पक्षांमधील वाद शिगेला पोहोचलाय. कारण अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय.

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अजितदादांच्या पक्षाने केलाय. लिका सय्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सुरक्षा द्या, अशी मागणी अजितदादांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

७ मार्च २०२४ रोजी अरुणाचल प्रदेशातील नानसई विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उमेदवार श्री लिका सय्या यांच्यावर भाजप उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनीही यावेळी तातडीने कारवाई करण्याची मागणी केलीय.

अरुणाचल प्रदेशाच्या विधानसभेसाठी ८ उमेदवार जाहीर

अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादीकडून करण्यात आलीय. उमेदवारांची नावे जाहीर करण्याच्या काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातर्फे सोमवारी अरुणाचल प्रदेशातील जनसंपर्क कार्यक्रमादरम्यान उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीने घोषित केलेले उमेदवार -

1- लिखा साया- 16-याचुली विधानसभा

2- तपंग तलोह- 35-पंगिन विधानसभा

3- लोमा गोलो- 12-पक्के-केसांग विधानसभा

4-न्यासन जोंगसम- 53-चांगलांग उत्तर विधानसभा

5- नगोलिन बोई- 54-नामसांग विधानसभा

6- अजु चिजे- 33-मेहचूका विधानसभा

7- मोंगोल यामसो- 40-मनियांग-जेकु विधानसभा

8- वकील सलमान मोंगरे- 52- चांगलांग दक्षिण विधानसभा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पूजा करताना मंदिरात का वाजवतात घंटा; जाणून घ्या त्यामागील कारण

Sambhajinagar News : नांदूर मधमेश्वर पाणी प्रश्न पुन्हा पेटला; शेतकऱ्यांची पाटबंधारे कार्यालयावर धडक

Pune Porsche Car Accident: ३ कोटीची पोर्शे २००च्या स्पीडने पळवली; IT इंजिनिअर तरुण- तरुणीचा करुण अंत, बिल्डरच्या लेकाला निबंध लिहण्याची शिक्षा!

HSC Result 2024: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट

Bhandup Thackeray Group News | ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची सुटका

SCROLL FOR NEXT