अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहा Saam TV
देश विदेश

अमेरिकेत थेट घरावर कोसळलं विमान; अंगावर काटा आणणारा Video पाहा

आकाशातून चाललेल्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे ते घरावर कोसळून मोठी हानी झाल्याची घटना अमेरीकेत घडली आहे.

वृत्तसंस्था

कॅलिफोर्निया: आकाशातून चाललेल्या एका विमानाला अचानक आग लागल्यामुळे ते घरावर कोसळून मोठी हानी झाल्याची घटना अमेरीकेत घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात एक विमान निवासी भागात कोसळलं आहे. एका घरावर हे पेटतं विमान कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

...असा झाला अपघात

अमेरिकेतील कॅलिफोर्निया भागात दोन इंजिन असणारं विमान पडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. निवासी भागात हे विमान कोसळलं. याच भागात एक शाळादेखील आहे. घटनास्थळा जवळील शाळेच्या इमारतीचंही यात नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. विमानाला दोन इंजिनं होती, परंतु दुसऱ्या इंजिनाचा काहीही उपयोग चालकाला करता आला नाही. विमानाला आग लागल्यामुळे विमान जमिनीवर कोसळलं आणि जोरदार आवाज झाला.

रिपोर्टमधील दाव्यानुसार, सेसना 340 नावाच्या या विमानातून 6 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. या विमाानानं ऍरिझोनावरून उड्डाण केलं होतं, त्यानंतर काही मिनिटांतच विमानाला आग लागली आणि ते खाली कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर घरांनाही आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझवत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Avoid Rice Benefits: रात्री भात खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतात?

Husband wife relationship: पत्नीशी भांडण झाल्यानंतर पतीने मित्रांसोबत 'या' गोष्टी कधीच शेअर करू नये

संपूर्ण विधानसभा बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

Daily walking benefits: तुमच्या वयोमानानुसार किती दररोज किती मिनिटं पायी चाललं पाहिजे?

Maharashtra News Live Update: जळगावातील कासोदा येथे कृषी विभागाची मोठी कारवाई; प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे जप्त

SCROLL FOR NEXT