Husband wife relationship: पत्नीशी भांडण झाल्यानंतर पतीने मित्रांसोबत 'या' गोष्टी कधीच शेअर करू नये

Surabhi Jayashree Jagdish

पती-पत्नी

पती-पत्नीचं नातं आयुष्यभराचं असतं. हे नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. छोट्या गोष्टींवरून नात्यात दुरावा येऊ देऊ नये.

भांडणं

प्रत्येक नात्यात कधी ना कधी वाद होतात. पण रागाच्या भरात नातं खराब होईल असं वागू नये. प्रेम आणि संयमामुळे नातं अधिक मजबूत होतं.

पत्नीच्या प्रेमाची चर्चा करू नका

आचार्य चाणक्यांच्या मते, पत्नी किती प्रेम करते हे इतरांना सांगू नये. यामुळे वैवाहिक नात्यावर वाईट नजर लागू शकते. पती-पत्नीचं प्रेम खासगी ठेवणंच योग्य मानलं जातं.

पत्नीच्या कुटुंबाचा आदर करा

पत्नीचा सन्मान म्हणजे तिच्या कुटुंबाचाही सन्मान होय. त्यांच्या खासगी गोष्टी बाहेर सांगू नयेत. यामुळे नात्यात विश्वास कायम राहतो.

घरातील वाद दुसऱ्यांना सांगू नका

पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणं किंवा मतभेद होतात. पण या गोष्टी इतर लोकांसोबत शेअर करू नयेत. यामुळे नात्यात गैरसमज आणि दुरावा वाढू शकतो.

जोडीदाराच्या कमतरतांची चर्चा टाळा

पत्नीच्या शारीरिक किंवा वैयक्तिक कमतरता इतरांना सांगू नयेत. असं केल्याने तिचा अपमान होतो आणि घरात वाद होऊ शकतात. एकमेकांचा आदर राखणं हाच सुखी संसाराचं नियम आहे.

भूतकाळ विसरा

प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही भूतकाळ असतो. पती-पत्नीने जुन्या गोष्टींमध्ये अडकून न राहता वर्तमानात आनंदाने जगावं.

Borivali Tourism: थंडीच्या दिवसात बाहेर भटकायला जायचंय? लांब न जाता बोरिवलीच्या या ठिकाणी फिरून या

येथे क्लिक करा