Surabhi Jayashree Jagdish
फिट राहण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी चालणं खूप फायदेशीर मानलं जातं. चालणं हा असा व्यायाम आहे ज्यामुळे संपूर्ण शरीर एक्टिव्ह राहतं. यामुळे शरीरातील कॅलरी जलद गतीने बर्न होण्यास मदत होते.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी चालणं उपयुक्त ठरतं. मात्र प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. विशेषतः वृद्ध किंवा अशक्त लोकांना रोज १५ हजार पावलं चालणं शक्य नसतं.
फक्त चालणं पुरेसं नसून योग्य वेग आणि वेळेचीही काळजी घ्यावी लागते. नियमित चालल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते. तज्ज्ञांच्या मते दररोज किमान अर्धा तास चालणं आवश्यक आहे.
६ ते १७ वर्षांच्या मुलांनी दररोज सुमारे १५ हजार पावलं चालावीत. १८ ते ४० वर्षांच्या लोकांसाठी १२ हजार पावलं फायदेशीर मानली जातात. यामुळे शरीर एक्टिव्ह राहून फिटनेस सुधारतो.
४० वर्षांनंतर शरीराची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. या वयोगटातील लोकांनी रोज ८ ते १० हजार पावलं चालणं योग्य मानलं जातं. यामुळे वजन नियंत्रणात राहून आरोग्य सुधारते.
६० वर्षांवरील लोकांनी दररोज ६ ते ८ हजार पावलं चालावीत. अधिक चालल्यास थकवा किंवा सांध्यांवर ताण येऊ शकतो. म्हणून आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार चालणं महत्त्वाचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुलांनी आणि किशोरवयीन मुलांनी किमान ९ हजार पावलं चालणं गरजेचं आहे. १८ ते ५९ वर्षांच्या प्रौढांनी ७ ते १० हजार पावलं चालण्याचा प्रयत्न करावा. नियमित चालण्याची सवय चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य देऊ शकते.