Delhi Air Pollution Saam Tv
देश विदेश

दिल्लीतील हवेचं प्रदूषण घातक पातळीवर, सर्व बांधकाम थांबवण्याचे आदेश, काय आहे कारण?

रेल्वे, संरक्षण आणि मेट्रोची बांधकाम वगळता इतर सर्व बांधकाम पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिवाजी काळे

दिल्ली - पंजाब आणि हरियाणा या दिल्ली (Delhi) शेजारील राज्यामध्ये शेतकऱ्यांनी पराली जाळण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळं राजधानी दिल्ली इथं हवेचं प्रदूषण घातक पातळीवर पोहोचलं आहे. शनिवारी राजधानी दिल्लीत एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 397 वर पोहोचला आहे (अत्यंत वाईट).

राजधानी दिल्ली इथं वाढलेल्या प्रदूषणामुळे (Air Pollution) सरकारने तातडीने पावलं उचलली आहेत. रेल्वे, संरक्षण आणि मेट्रोची बांधकाम वगळता इतर सर्व बांधकाम पुढील आदेश येईपर्यंत थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

वाहनांवर ही बंदी येणार…?

दिल्लीतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीतील BS III पेट्रोल आणि BS IV डीजल या वाहनावर देखील काही काळासाठी बंधन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेची गुणवत्ता… कोणत्या भागात किती AQI…

हरियाणा च्या फरीदाबाद इथं एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 400 च्या वर होता तर उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद इथं 367, ग्रेटर नोएडा इथं 385, गुरुग्राम इथं 375, नोएडा इथं 381, सोनीपत इथं 364, मानेसर इथं 381, बहादुर गढ 371 एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ची नोंद करण्यात आली आहे.

एअर क्वालिटी इंडेक्स च्या हवेच्या गुणवत्तेचं प्रमाण कसं ओळखावं…

एअर क्वालिटी इंडेक्स 0 ते 50: उत्तम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 51 ते 100: चांगली हवा

एअर क्वालिटी इंडेक्सः 101 ते 200 मध्यम हवा

एअर क्वालिटी इंडेक्स 201 ते 300 दरम्यानः खराब हवामान

एअर क्वालिटी इंडेक्स 301 ते 400 दरम्यानः हवा अत्यंत खराब

एअर क्वालिटी इंडेक्स 400 ते 500 च्या वरः मानवी आरोग्यास हानिकारक

आता वाढत्या एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) मुळे दिल्लीमध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रकृती खालावली, तातडीने रुग्णालयात दाखल; पक्षातील नेते भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये उपस्थित

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अवकाळी अन् हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई मिळणार; सरकारची मोठी घोषणा

Soaked Raisins Benefits: रोज सकाळी ५ भिजवलेले मनुके खा; शरीराला मिळतील हे 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Sunday Horoscope : अडचणीतून सहज सुटाल, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ; वाचा उद्याचे राशीभविष्य

Influencer Arrested: व्ह्यूजसाठी प्रसिद्ध युट्यूबचं महिलांसोबत धक्कादायक कृत्य; व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दाखवला इंगा

SCROLL FOR NEXT